मोठी बातमी: राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 3 हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणेची शक्यता

राज्यभरातील जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान | financial package for Farmers

मोठी बातमी: राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 3 हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणेची शक्यता
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 9:46 AM

मुंबई: अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाविकासआघाडी सरकारकडून तब्बल तीन हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकारमधील सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार सरकारच्या आतापर्यंतच्या पाहणीत राज्यभरातील जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘एसडीआरएफ’च्या निकषांनुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकासआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति दोन हेक्टरसाठी 6500 रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे. (Maha Vikas Aghadi government financial package for Farmers)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उस्मानाबादमध्ये आर्थिक पॅकेज जाहीर करण्याचे संकेत दिले होते. पंचनाम्यांचे काम 80 ते 90 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत बैठक घेऊन मदतीचा निर्णय जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक उद्या होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडून पत्रकारपरिषद घेऊन या पॅकेजची घोषणा केली जाऊ शकते.

गेल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पुरामुळे शेतजमीन खरवडून गेली होती. तसेच शेतातील पंप आणि सिंचनाची उपकरणेही पाण्यात वाहून गेली होती. पुराचे पाणी शिरल्याने विहीर गाळाने भरुन गेल्या होत्या. याशिवाय, पुराचे पाणी घरात शिरल्याने कापून ठेवलेली पिकंही भिजली होती. त्यामुळे अनेक भागांमध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठीही वैरण शिल्लक राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांना कशाप्रकारे दिलासा देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

‘आकड्यांची फेकाफेक करणार नाही, पण मदत नक्की करेन’

केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी आता तुमच्यासमोर मदतीचे काहीही आकडे सांगणार नाही. मात्र, पंचनामे पूर्ण होऊन मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मी तुमचं आयुष्य उभारायला पूर्ण ताकदीने मदत करेन, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले होते.

संबंधित बातम्या:

केवळ तुम्हाला बरं वाटण्यासाठी आकड्यांची फेकाफेक करणार नाही, पण मदत नक्की करेन; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

थिल्लर-चिल्लरकडे बघायला वेळ नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना तगादा, अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नका; फडणवीसांचं सरकारला आवाहन

(Maha Vikas Aghadi government financial package for Farmers)

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.