Corona Update | राज्यात दिवसभरात तब्बल 1602 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 27,524 वर
राज्यात दिवसभरात तब्बल 1602 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 524 वर पोहोचला आहे.
मुंबई : राज्यात दिवसभरात तब्बल 1602 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 524 वर पोहोचला आहे. राज्यात आज दिवसभरात 512 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 6 हजार 59 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे (Maharashtra Corona Update).
राज्यात आज दिवसभरात 44 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये मुंबईतील 25, नवी मुंबईतील 10, पुण्यातील 5, औरंगाबाद शहरातील 2, पनवेल आणि कल्याण डोंबिवली येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 1 हजार 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 16,738 वर
राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनाने कहर केला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या आता 16 हजार 738 वर पोहोचली आहे. मुंबईत आतापर्यंत तब्बल 621 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाचे जास्त रुग्ण
राज्यात मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 314 वर पोहोचली आहे. तर 175 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
ठाणे शहरातील बाधितांचा आकडा 1,215 वर
ठाण्यातही कोरोनाचे रोज नवे रुग्ण आढळत आहेत. ठाणे महापालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 215 वर पोहोचली आहे. तर कल्याण डोंबिवली शहरातील बाधितांचा आकडा 424 वर पोहोचला आहे. नवी मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकड्यांनी 1100 चा आकडा पार केला आहे. नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 113 वर पोहोचला आहे. तर मुंबईलगत असलेल्या वसई-विरार, मीरा-भाईदर येथील कोरोना रुग्णांचा आकडा 200 च्या पुढे गेला आहे.
मालेगाव आणि औरंगाबादेत कोरोनाचा कहर
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले. मालेगावातील कोरोनाबाधितांचा आकडा थेट 649 वर पोहोचला आहे. तर औरंगाबाद येथील कोरोनाबाधितांचा आकडा 700 च्या पुढे गेला आहे. त्यामुळे धाकधुक वाढली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यातील बाधितांचा आकडाही झपाट्याने वाढला आहे. जळगावमधील कोरोनाबाधितांचा आकडा आता 200 च्या पार गेला आहे. याशिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येदेखील कोरोना फोफावत चालला आहे.
राज्य सरकारचे शर्थीने प्रयत्न
कोरोनावर नियंत्रण मिळावे यासाठी राज्य सरकार प्रचंड मेहनत घेत आहेत. राज्यात आतापर्यंत 2 लाख 40 हजार 145 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 2 लाख 12 हजार 621 रुग्णांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.
राज्यात सध्या 1512 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 14,253 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 59.04 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले. याशिवाय राज्यात 3 लाख 15 हजार 686 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 15 हजार 465 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात कुठे किती रुग्ण?
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 16738 | 374 | 621 |
पुणे (शहर+ग्रामीण) | 3159 | 938 | 171 |
पिंपरी चिंचवड मनपा | 155 | 34 | 4 |
ठाणे (शहर+ग्रामीण) | 1381 | 36 | 14 |
नवी मुंबई मनपा | 1113 | 80 | 14 |
कल्याण डोंबिवली मनपा | 424 | 91 | 4 |
उल्हासनगर मनपा | 82 | 0 | |
भिवंडी निजामपूर मनपा | 39 | 11 | 2 |
मिरा भाईंदर मनपा | 248 | 143 | 2 |
पालघर | 42 | 1 | 2 |
वसई विरार मनपा | 295 | 105 | 11 |
रायगड | 166 | 5 | 2 |
पनवेल मनपा | 161 | 9 | |
नाशिक (शहर +ग्रामीण) | 158 | 2 | 0 |
मालेगाव मनपा | 649 | 34 | |
अहमदनगर (शहर+ग्रामीण) | 70 | 36 | 3 |
धुळे | 71 | 6 | |
जळगाव | 223 | 1 | 26 |
नंदूरबार | 22 | 2 | |
सोलापूर | 344 | 41 | 21 |
सातारा | 125 | 3 | 2 |
कोल्हापूर | 25 | 2 | 1 |
सांगली | 43 | 29 | 1 |
सिंधुदुर्ग | 7 | 2 | 0 |
रत्नागिरी | 83 | 2 | 3 |
औरंगाबाद | 716 | 14 | 19 |
जालना | 20 | 0 | |
हिंगोली | 61 | 1 | 0 |
परभणी | 2 | 1 | |
लातूर | 32 | 8 | 1 |
उस्मानाबाद | 4 | 3 | 0 |
बीड | 1 | 0 | |
नांदेड | 57 | 4 | |
अकोला | 208 | 14 | 12 |
अमरावती | 92 | 13 | |
यवतमाळ | 99 | 22 | 0 |
बुलडाणा | 26 | 8 | 1 |
वाशिम | 3 | 0 | |
नागपूर | 331 | 84 | 2 |
वर्धा | 1 | 0 | 1 |
भंडारा | 1 | 0 | 0 |
गोंदिया | 1 | 1 | 0 |
चंद्रपूर | 5 | 1 | 0 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 41 | 0 | 10 |
एकूण | 27524 | 6059 | 1019 |
संबंधित बातम्या :
Corona | सोलापुरात कोरोनाचा कहर, 32 दिवसात 300 रुग्णांचा टप्पा पार, आठवड्याला सरासरी 70 नवे रुग्ण
कोरोना कदाचित कधीच नष्ट होणार नाही, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा