प्रतिकात्मक कुर्बानी, नियमात शिथीलता नाही, राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स

राज्य सरकारकडून बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत (Maharashtra Government issues guidelines on bakri eid 2020 celebration).

प्रतिकात्मक कुर्बानी, नियमात शिथीलता नाही, राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स
Follow us
| Updated on: Jul 17, 2020 | 6:11 PM

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करावी, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. राज्य सरकारकडून बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करावे, असंदेखील आवाहन अनिल देशमुख यांनी केलं आहे (Maharashtra Government issues guidelines on bakri eid 2020 celebration).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी, असे सर्वानुमते ठरले. त्या अनुषंगाने शासनाने काही मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं (Maharashtra Government issues guidelines on bakri eid 2020 celebration).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मार्गदर्शक सुचना नेमक्या काय आहेत?

1) कोरोनामुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.

2) सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा फोनवरुन जनावरे खरेदी करावेत.

3) नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.

4) प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

5) बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

6) कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी जारी केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

हेही वाचा : चार महिन्यात सर्व सण साधेपणाने झाले, बकरी ईदही साधेपणाने करु, पुढच्या वर्षी जल्लोष करु : मुख्यमंत्री

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.