संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन, वंचित आघाडीला कोणतं चिन्ह मिळालं?

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना चिन्हांचं वाटप (Political Parties and Election Symbol) सुरु केलं आहे.

संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन, वंचित आघाडीला कोणतं चिन्ह मिळालं?
Follow us
| Updated on: Aug 13, 2019 | 11:13 AM

Political Parties and Election Symbol नवी दिल्ली :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2019) तोंडावर आल्या आहेत. पुढील महिन्यात निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा घोषित करु शकते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर अखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवणुका होतील. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्व पक्ष तयारी करत असताना, निवडणूक आयोगानेही आपली तयारी सुरु केली आहे.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना चिन्हांचं वाटप (Political Parties and Election Symbol) सुरु केलं आहे. निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह दिलं आहे. तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन हे चिन्ह मिळालं आहे. याशिवाय मराठा मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाला हिरा हे चिन्ह मिळालं आहे.

आगामी निवडणुकीत या पक्षांनी उमेदवार उतरवल्यास त्यांचे चिन्ह गॅस सिलेंडर आणि शिलाई मशीन असेल. राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांची निवडणूक चिन्हं यापूर्वीचीच असतील. जसे काँग्रेसचा पंजा, भाजपचं कमळ, शिवसेनेचा धनुष्यबाण, राष्ट्रवादीचं घड्याळ, मनसेचं रेल्वे इंजिन अशी चिन्हं असतील.

कोणत्या पक्षाला कोणतं चिन्ह

  • वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर
  • संभाजी ब्रिगेड – शिलाई मशीन
  • महाराष्ट्र क्रांती सेना – हिरा
  • हम भारतीय पार्टी – ऊस घेतलेला शेतकरी
  • टिपू सुलतान पार्टी – किटली
  • भारतीय जनसम्राट पार्टी – टेलिफोन

संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादीसोबत

दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राजकीय पक्षांच्या राज्यभर विविध यात्रा सुरु आहेत. अशा परिस्थितीत  संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) पाठिंबा जाहीर केला आहे. विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) काम करणार असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केली. संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड(Pravin Gaikwad) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

संबंधित बातम्या 

Sambhaji Brigade | काँग्रेसने दखल घेतली नाही, आता राष्ट्रवादीसोबत : संभाजी ब्रिगेडची घोषणा  

मराठ्यांची क्रांती सेना 47 जागा लढवणार, फक्त ‘ही’ जागा सोडली!

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.