AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rains Live | मुंबई-ठाणे-पुण्यात मुसळधार, रत्नागिरीत धुवांधार

मुंबईतील दादर, वरळी, वांद्रे, अंधेरी, बोरीवलीसह बहुतांश भागात सकाळपासून पावसाने हजेरी लावली. (Maharashtra Rains Day after Nisarga Cyclone)

Maharashtra Rains Live | मुंबई-ठाणे-पुण्यात मुसळधार, रत्नागिरीत धुवांधार
| Edited By: | Updated on: Jun 04, 2020 | 12:57 PM
Share

मुंबई : निसर्ग चक्रीवादळ ओसरले असले, तरी राज्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर-उपनगरांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, वसई-विरार भागात जोरदार पाऊस बरसत आहे. पुण्यातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे बळीराजापासून सर्वजण सुखावले आहेत. (Maharashtra Rains Day after Nisarga Cyclone)

सकाळपासूनच मुंबईवर काळे ढग दिसत होते. मुंबईतील दादर, वरळी, वांद्रे, अंधेरी, बोरीवलीसह बहुतांश भागात सकाळपासून पावसाने हजेरी लावली. कधी रिमझिम पाऊस पडत आहे, तर अचानक पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. कुठे सोसाट्याचा वारा वाहत आहे, तर काही ठिकाणी ढगांचा गडगडाटही ऐकायला मिळत आहे.

Mumbai rain Live, Maharashtra Rain Update

[svt-event title=”राज ठाकरे यांचं निवासस्थान ‘कृष्णकुंज’ परिसरात पावसाच्या पाण्याचं तळं ” date=”04/06/2020,12:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईत जोरदार पाऊस, शीव, किंग सर्कल परिसरात पाणी साचलं” date=”04/06/2020,12:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ठाण्यातील गोखले रोड येथे दोन झाडे पडली” date=”04/06/2020,12:48PM” class=”svt-cd-green” ] ठाण्यातील गोखले रोड येथे दोन झाडे पडली, एक झाड तीन मजली देवधर रुग्णालयावर कोसळल्याने परिसरातील वाहतूक थांबवली, याच ठिकाणी दुसरे भले मोठे झाड रस्त्यावर पडले, घटनास्थळी अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचे काम सुरु, रस्त्यावर असणाऱ्या एका चार चाकी वाहनाचे नुकसान [/svt-event]

[svt-event title=”दापोली तालुक्‍यात मुसळधार पावसाला सुरुवात” date=”04/06/2020,12:46PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी- दापोली तालुक्‍यात मुसळधार पावसाला सुरुवात, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 90 मिलिमीटर पावसाची नोंद, मंडणगड तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस, मंडणगड तालुक्‍यात 130 मीटर पावसाची नोंद, चक्रीवादळानंतर आता पावसाच्या कोसळधारा [/svt-event]

ठाणे शहरात पावसाचा जोर पाहायला मिळाला. काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मिरा भाईंदर, वसई विरारमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

भिवंडी शहरासह ग्रामीण भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस आहे. कल्याणमध्ये जोरदार पाऊस कोसळत असून अंबरनाथ बदलापुरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

हेही वाचा : पुण्यात घराचं छप्पर उडून वृद्धेचा मृत्यू, अलिबागमध्ये विजेचा खांब पडून एकाचा बळी

चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे भीमा खोऱ्यात टेमघर आणि कृष्णा खोऱ्यातील मोळेश्वर कण्हेर येथे सर्वाधिक पाऊस पडला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणात मंगळवारपासून पाऊस आहे.

हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून काही भागात रिमझिम पाऊस आहे. पावसामुळे वातावरणात गारवा आला असून बळीराजा पेरणीसाठी सज्ज आहे.

जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु आहे. अंबड शहरासह जाफराबाद तालुक्यात पहाटे चार ते सहाच्या सुमारास पाऊस बरसला. यामुळे अंबड शहरातील मत्स्योदरी व पंचायत समिती समोरील दुकानाचे पत्रे उडाले. घनसावंगी, भोकरदन, परतूर, मंठा तालुक्यात वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण आहे.

(Maharashtra Rains Day after Nisarga Cyclone)

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.