Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊन काळात तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग, स्वयं सहाय्यता गटांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य

स्वयं सहाय्यता गटातील दहा हजार पेक्षा जास्त व्यक्ती/ महिलांनी राज्य आणि केंद्र शासनाच्या महिलांसाठीच्या योजनांबाबत ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. (Maharashtra Self Help Group members Online training)

लॉकडाऊन काळात तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग, स्वयं सहाय्यता गटांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य
Follow us
| Updated on: May 22, 2020 | 5:53 PM

नवी मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता गटातील दहा हजार पेक्षा जास्त व्यक्ती/ महिलांनी राज्य आणि केंद्र शासनाच्या महिलांसाठीच्या योजनांबाबत ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. ही किमया महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) यांनी केली. विशेष म्हणजे असे प्रशिक्षण देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. माहिती तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग लॉकडाऊनच्या काळात झाला. (Maharashtra Self Help Group members Online training)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 22 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार, ऑनलाईन प्रशिक्षणासाठी विविध संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यात पार्थ नॉलेज नेटवर्क संस्थेचा समावेश होता. या संस्थेतर्फे सदर प्रशिक्षण देण्यात आले.

राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जातात. गावोगावी, खेडोपाडयांमध्ये असलेल्या स्वयं सहाय्यता गटांमधील महिलांना या योजनांची माहिती मिळावी. यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) हे प्रयत्नशील आहे.

नवी मुंबई येथील ग्राम विकास भवन येथे यांचे प्रशिक्षण केंद्र आहे. यापूर्वी विविध जिल्ह्यांमधून सुमारे पन्नास प्रतिनिधींना बोलवून त्यांना योजनांबाबत प्रशिक्षण दिले जात होते. या प्रशिक्षित प्रतिनिधींद्वारे संपूर्ण राज्यातील स्वयंसहाय्यतागटातील महिलांना प्रशिक्षित केले जात होते. कोरोनाच्या प्रादूर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात शासनाने जमावबंदी लागू केली. त्यामुळे अशाप्रकारचे प्रशिक्षण शिबिरे घेणे बंद झाले. मात्र यावर मार्ग काढत ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय घेण्यात आला. (Maharashtra Self Help Group members Online training)

स्वयंसहाय्यतागटात काम करणाऱ्या महिलांना कृषि सखी प्रशिक्षण, केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ, क्षमता वृध्दीसाठी विविध विकास कार्यक्रम प्रशिक्षणाद्वारे राबविण्यात आले आहेत. महिलांनी त्यांच्या घरात बसून स्मार्ट फोनद्वारे या कार्यक्रमाचा लाभ घेतला. एनआरएलएमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांच्या संकल्पनेतून हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी झाला.

संपूर्ण भारतात कोविड सारख्या आजाराने लॉकडाऊन असताना महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन महिलांना प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण दररोज चार तास सुरु होते. या प्रशिक्षणादरम्यान चर्चासत्र, पीपीटी सादरीकरण, छोटेखानी फिल्म आणि सहभागी महिलांची प्रश्नोत्तरे यांचा समावेश होता.

गावपातळीवरील सहा वेगवेगळया प्रशिक्षणात 34 जिल्हे सहभागी झाले होते. अडीच हजारांपेक्षा जास्त अधिकारी/कर्मचारी आणि दहा हजारापेक्षा जास्त समुदाय संसाधन व्यक्तींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. त्यानुसार 27 एप्रिल ते 2 मे 2020 या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण झाल्याची माहिती आर.विमला यांनी दिली आहे. (Maharashtra Self Help Group members Online training)

संबंधित बातम्या : 

मुंबईत ‘या’ रेल्वे स्थानकांवर आरक्षित गाड्यांसाठी तिकीट काऊंटर सुरु

लॉकडाऊनमध्ये बँकांच्या ठेवी वाढल्या, महिन्याभरात 139391 कोटी रुपयांनी वाढ

लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.