महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, माजी खासदार-माजी नगरसेवकालाही संसर्ग
मंत्र्याची पहिली 'कोरोना' चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्याला घरातच क्वारंटाईन करण्यात आले होते, परंतु दुसऱ्या चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत (Maharashtra Minister Corona Positive)
मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारमधील मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मंत्र्याचे निकटवर्तीय असलेले माजी खासदार आणि माजी नगरसेवक यांनाही ‘कोरोना’चा संसर्ग झाला आहे. संबंधित मंत्र्याला मुंबईतील सरकारी रुग्णालयात हलवले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. (Maharashtra Minister Corona Positive)
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील या मंत्र्याला मंगळवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. काल (गुरुवार 23 एप्रिल) त्याची ‘कोरोना’ टेस्ट पॉझिटिव्ह आली.
गेल्या आठवड्यात या मंत्र्याची पहिली ‘कोरोना’ चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर मंत्र्याला घरातच क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु आता दुसऱ्या चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
ठाण्यातील खाजगी रुग्णालयातून या मंत्र्याची रवानगी मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात करण्यात आली आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून सुदैवाने त्याची प्रकृती स्थिर आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मंत्र्याचे निकटवर्तीय असलेले माजी खासदार, त्या माजी खासदाराची पत्नी आणि माजी नगरसेवक यांनाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे. मंत्र्याच्या बंगल्यावरील 16 जण यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून मंत्र्याच्या सर्व कुटुंबीयांनाही आता क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पाहा व्हिडिओ:
VIDEO : Corona | कोरोनाच्या सुपरफास्ट 50 न्यूज https://t.co/ogiuLXyVkS
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 24, 2020
(Maharashtra Minister Corona Positive)