PHOTO : देवाचिया द्वारी, उभा क्षणभरी!; आठ महिन्यानंतर भाविकांनी घेतलं देवदर्शन!
राज्यातील सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. (Maharashtra Temple Reopen)
Follow us
कोरोना काळात तब्बल 9 महिन्यांनी राज्यातील मंदिरं खुली झाली आहेत. राज्यातील सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत.
मंदिरात किंवा कोणत्याही प्रार्थनास्थळांमध्ये दर्शन घेताना संबंधित प्रशासनाने काही नियमावली तयार केली आहे.
आधी ऑनलाईन नोंदणी, मगच दर्शन हा नियम राज्यातील सर्वच मंदिरांनी केला आहे.
त्यामुळे तुळजाभवानी, पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, अक्कलकोट, जेजुरी आणि शिर्डीत दर्शनासाठी ऑनलाईन पासची सोय करण्यात आली आहे.
मंदिरात दुग्धाभिषेक, सिंहासन पूजेसह इतर पूजा करण्यास मनाई करण्यात आली आहे.
तुळजाभवानी मातेचे मंदिर सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
यावेळी 10 वर्षाखालील लहान बालके आणि 65 पेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.
शिर्डीतील साईमंदिरात दिवसभरात केवळ सहा हजार भाविकांना दर्शन दिले जाणार आहे.
मास्क आणि इतर सर्व गोष्टी पूर्ण असल्यावरच त्यांना प्रवेश दिला जात आहे.
प्रत्येक भक्तांची थर्मल स्कॅनिंग करून आणि सॅनिटायझर लावूनच मंदिरात सोडण्यात येत आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सॅनिटाईज केलं आहे.
भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क लावणे बंधनकारक असणार आहे.
सर्व धार्मिकस्थळांमध्ये सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 या कालावधीत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
यावेळी मंदिरात हार, ओटी साहित्य आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अनेक महिन्यांनंतर मंदिर खुली करण्यात आल्यानंतर भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.