Corona : मालेगाव ‘कोरोना’ हॉटस्पॉट कसं बनलं?

मालेगावमध्ये कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे लॉकडाऊनच्या काळात मालेगावकारांनी दाखवलेला निष्काळजीपणा.

Corona : मालेगाव 'कोरोना' हॉटस्पॉट कसं बनलं?
Follow us
| Updated on: Apr 19, 2020 | 5:16 PM

नाशिक : मुंबई-पुणे पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon Is New Corona Hotspot) शहर हे राज्यातील नवीन कोरोना हॉटस्पॉट बनलं आहे. दिवसेंदिवस शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून मालेगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 77 वर जाऊन पोहोचली आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण 14 परिसर कँटोमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे सर्व एरिया (Malegaon Is New Corona Hotspot) सील करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी शहारत 4 एसआरपीएफच्या तुकड्या, 150 अधिकाऱ्यांसह सुमारे एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 437 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 397 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. तसेच, एक लाखाचा दंडही वसूल करण्यात आला आहे. शहरातील सर्व बँकाही 19 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तर मालेगाव शहरासह 2 किमीपर्यंत सर्व पेट्रोल पंपही बंद करण्यात आले आहेत.

मालेगावमध्ये कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे लॉकडाऊनच्या काळात मालेगावकारांनी दाखवलेला निष्काळजीपणा, प्रशासनाची उदासीनता.  कारण संचारबंदीची ज्या प्रकारे अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती, ती करण्यात आली नाही. परिणामी शहरातील अनेक भागात लोकांचा मुक्त संचार पाहायला मिळाला. मालेगावच्या ज्या भागात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, त्यात अनेक भाग हे झोपडपट्टी आहेत. तर काही भाग दाट लोकवस्ती असलेले आहेत. त्यात अधिक प्रमाणात यंत्रमाग कामगार राहतात, तर काही भाग हा चांगले सुशिक्षित, यंत्रमाग मालक नागरिक राहत असलेल्या भाग आहे (Malegaon Is New Corona Hotspot).

मालेगाव हे यंत्रमाग कामगारांचं शहर म्हणू+न ओळखलं जातं. शहरात सुमारे 2 लाख यंत्रमाग असून तितकेच त्यावर कामकरणारे मजूर आहे. यंत्रमाग काम करणाऱ्या कामगारांमध्ये टीबीरोग जास्त प्रमाणात आढळतो धाग्याचे बारीक-बारीक कण नाका तोंडाद्वारे शरीरात जाऊन फुफ्फुसं निकामी करतात आणि कोरोना ही फुफ्फुसावर अटॅक करत असल्याने या लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यासाठी जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ . सईद फाराणी सांगतात.

शहरातील मोमीनपुरा, कमालपुरा, मदिना बाग, इस्लामाबाद, आझाद नगर, दत्त नगर हे भाग झोपडपट्टीचे आहे. तर इतर भाग हा चांगला, तर काही दाट लोक वस्ती असलेला भाग आहे. त्यामुळे ही रुग्णांची संख्या वाढत असल्याची शक्यता आहे.

कोरोनापासून वाचण्याचा फक्त एकच मार्ग असून तो म्हणजे सरकार आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करणे. आत्यावश्यक गरज असेल तरच बाहेर पडावे, अन्यथा बाहेर न पडण्याचे आवाहन स्थानिक आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी जनतेला केले आहे.

शहरात कोरोना बधितांच्या वाढत्या संख्येने जिल्हाप्रशासनाची चिंता वाढली असून ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत त्या भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी 250 पथक स्थापन करण्यात आले आहेत. युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिकांची मदतही घेणार असल्याचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी सांगितले.

मालेगाव शहरतील हॉटस्पॉट

  • मोमीनपुरा
  • कमालपुरा,
  • नयापुरा
  • अक्स कॉलनी
  • गुलाब पार्क
  • मदिना बाग
  • नूर बाग
  • अपना सुपर मार्केट
  • हजार खोली
  • इस्लामाबाद
  • खुसमत पुरा
  • बेल बाग
  • मोतीपुरा
  • झाद नगर
  • दत्त नगर

मालेगाव शहरातील कोरोनाबाधितांची संख्या

  • मोमीनपुरा – 13
  • कमालपुरा – 11
  • नयापुरा -05
  • अक्स कॉलनी – 03
  • गुलाब पार्क – 02
  • मदिना बाग – 02
  • नूर बाग – 02
  • अपना सुपर मार्केट – 01
  • हजार खोली – 01
  • इस्लामाबाद – 02
  • खुसमत पुरा – 01
  • बेल बाग – 02
  • मोतीपुरा – 01
  • आझाद नगर – 01
  • दत्त नगर – 01
  • एकूण – 48

Malegaon Is New Corona Hotspot

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.