मालेगाव महापालिकेचे प्रताप; पोलीस मैदानाच्या सरकारी जागेची इदगाह ट्रस्टला खिरापत
येणाऱ्या काळात मालेगाव महापालिकेची निवडणूक रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वतःकडे मते खेचण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने विशिष्ट जाती-धर्मांना प्रलोभने दाखवायला आत्तापासूनच सुरुवात केली आहे. त्याचीच ही चुणूक आहे.
नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) महापालिकेने (Municipal Corporation) ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेले प्रताप सध्या चांगलेच चर्चेत आहेत. येथे पोलीस मैदानासाठी राखीव असलेली शासकीय मालकीची जागा चक्क कायमस्वरूपी इदगाह ट्रस्टला देण्याचा ठराव सत्ताधारी काँग्रेसने मंजूर करून घेतला. या ठरावाला सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेनेने विरोध केला आहे. तर भाजपने पोलीस मैदानावर बसून महासभेत ऑनलाइन सहभागी होत विरोध दर्शवला. येणाऱ्या काळात मालेगाव महापालिकेची निवडणूक रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वतःकडे मते खेचण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने विशिष्ट जाती-धर्मांना प्रलोभने दाखवायला आत्तापासूनच सुरुवात केली आहे.
नेमका प्रकार काय?
मालेगाव महापालिकेची महासभा महापौर ताहेरा शेख आणि उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पोलीस कवायत मैदानाची जागा इदगाह ट्रस्टला द्यायचा विषय सभेसमोर आला. या विषयाला सत्ताधारी शिवसेनेसह भाजपने तीव्र विरोध केला. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला. मात्र, महापौरांनी या गोंधळात ठराव मंजूर केला. विरोधक या विषयाचे भांडवल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेना, भाजप आक्रमक
मालेगाव महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. विशेष म्हणजे महापौर ताहेरा शेख यांच्यासह 27 काँग्रेस नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आता येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत. त्यावरून सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झालेत. या ठरावाला शिवसेनेचे उपमहापौर नीलेश आहेर यांनी विरोध केला आहे.
भाजप म्हणते आमदारांचे षडयंत्र
मालेगावमध्ये पोलीस मैदानाची जााग इदगाह ट्रस्टला देणे हे दोन्ही आमदारांचे षडयंत्र असल्याचा आरोप भाजपचे गटनेते सुनील गायकवाड यांनी केला आहे. गायकवाड यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, कृषिमंत्री तथा मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे आणि मालेगाव मध्यचे एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे षडयंत्र रचले आहे. महापालिका आणि राज्य शासनाने एकाचवेळी बाह्य मतदारसंघात सात कत्तलखान्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे मालेगाव बाह्यच्या आमदारांचे खरे हिंदुत्व समोर आले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
इतर बातम्याः
ऐतिहासिक नाशिकला स्मार्ट सिटीचा चूड; गोदाघाट उद्धवस्त करून मंदिरे तोडली, आंदोलन पेटणार!
युक्रेनमधले 16 विद्यार्थी सुखरूप परतले; नाशिककरांच्या आनंदाला पारावार नाही, वाजत-गाजत स्वागत!