AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी… मारुती सुझुकीने ‘या’ सेडन कार केल्या रिकॉल, तुमच्याकडे कोणती आहे?

मारुती सुझुकीने Dzire S Tour मधील काही युनिट्स परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एअरबॅग्जबाबतची समस्या असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे आता कंपनीने या सेडन प्रकारच्या कार परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक ग्राहकांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

मोठी बातमी… मारुती सुझुकीने ‘या’ सेडन कार केल्या रिकॉल, तुमच्याकडे कोणती आहे?
कारImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 5:34 PM

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मारुती सुझुकीने आपल्या काही गाड्या परत मागवल्या आहेत. ही कार मारुती सुझुकी डिझायर एस टूर (Dzire S Tour) कार आहे. ही कार सेडन बॉडी टाईपमध्ये येत असून टूर व्हेरिएंट कॅबमध्ये ही कार मोठ्या संख्येने वापरली जाते. आपल्या अनेकदा ती ओला, उबेर किंवा इतर प्रकारच्या कॅब सेवांमध्ये दिसून आली असेल. वास्तविक, कंपनीने या रिकॉलमागे कारण सांगताना संबंधित कार्समध्ये एअरबॅगमधील (Airbags) दोष आढळल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कंपनीने या कार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

166 युनिट्स परत मागवण्याचा निर्णय

भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुतीने डिझायर टूर एस सेडनच्या 166 युनिट्स परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर कंपनी त्यात नवीन एअरबॅगचा समावेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित कार कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला तयार केल्या असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

अपघातादरम्यान धोकादायक

प्रवाशांची सुरक्ष्ा बघता या एअरबॅग्ज बदलणे आवश्यक असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीकडून लावण्यात आलेल्या एअरबॅग सदोष असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कंपनी याप्रकरणी कुठल्याही प्रकारची जोखीम स्वीकारण्यास तयार नसल्याचे सांगण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत या एअरबॅग उघडणे कठीण होऊ शकते. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

कंपनी करेल संपर्क

मारुती सुझुकी लवकरच सदोष कार मिळालेल्या कारच्या मालकांशी संपर्क साधून त्यांना कारमधील एअरबॅग्जबद्दल माहिती देईल. यासोबतच त्यांची बदली करण्याची प्रक्रियाही सांगण्यात येणार आहे. मारुती सुझुकी डिझायर एस टूरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची सुरुवातीची किंमत 6.05 लाख रुपये असून ती 7 लाख रुपयांपर्यंत जाते. या दोन्ही एक्स शोरूम किमती आहेत. मारुतीची ही कार सीएनजी व्हेरिएंटसह तीन प्रकारांमध्ये येते. ही सेडन कार 113 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते. यात पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.