Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिशन बिगीन अगेन | तिसरा टप्पा सुरु, कोणती बंधने कायम, कोणत्या नियमांना शिथिलता?

जिल्ह्यांतर्गत बस आणि एसटी सेवा आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. बस क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी प्रवास करु शकतील. (Mission Begin Again Phase Three Maharashtra Unlock)

मिशन बिगीन अगेन | तिसरा टप्पा सुरु, कोणती बंधने कायम, कोणत्या नियमांना शिथिलता?
Follow us
| Updated on: Jun 08, 2020 | 8:39 AM

मुंबई : ठाकरे सरकारच्या ‘पुनश्च हरि ओम’ अर्थात ‘मिशन बिगीन अगेन’चा तिसरा टप्पा आजपासून (सोमवार 8 जून) सुरु होत आहे. खासगी कार्यालये दहा टक्के कर्मचारी वर्गासह पुन्हा सुरु होणार आहेत. तर मुंबईतील ‘बेस्ट’ बससेवा पुन्हा धावणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळालेल्या सवलती तिसऱ्या टप्प्यात कायम राहतील. (Mission Begin Again Phase Three Maharashtra Unlock)

काय सुरु?

1. दहा टक्के किंवा दहा (जे अधिक असेल ते) कर्मचाऱ्यांसह खासगी कार्यालये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडी राहतील. एमएमआरए (मुंबई महानगर) क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका हद्दीत सरकारी कार्यालये 15% मनुष्यबळांसह उघडतील. कर्मचारी आणि कंपनी या दोहोंना ‘कोरोना’शी संबंधित सर्व नियम पाळणे बंधनकारक असेल

नियम इथे वाचा : खिडक्या उघडा, तीन फुटांवर बसा, राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स

2. जिल्ह्यांतर्गत बस आणि एसटी सेवा आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. बस क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी प्रवास करु शकतील. म्हणजेच एका सीटवर एकाच प्रवाशाला मुभा असेल.

काय बंद?

1. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृह, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार, मोठी सभागृहे उघडण्यास संमती नाही.

2. केश कर्तनालये, सलून, ब्यूटी पार्लर बंद राहणार आहेत.

3. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास अद्याप उघडणार नाहीत.

4. केंद्राने मान्यता दिली असली तरी राज्यात धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही.

5. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.

6. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात राज्यात ‘या’ गोष्टी सुरु

पहिला टप्पा – सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा, केवळ इनडोअर स्टेडियममध्ये परवानगी नाही

सामुहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही, लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य, केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी

सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते.

प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत. (Mission Begin Again Phase Three Maharashtra Unlock)

हेही वाचा : देशात हॉटेल, रेस्टॉरन्ट, धार्मिक स्थळं 8 जूनपासून सुरु होणार, गृहमंत्रालयाकडून नियमावली जाहीर

दुसरा टप्पा – दुसऱ्या टप्प्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत एकआड एक दिवस उघडतील.

1. ट्रायल रुम बंद राहतील. कपडे परत घेणे किंवा बदलून देणे, यांना मुभा नाही 2. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांची, त्यांनी होम डिलिव्हरी, टोकन सिस्टम, मार्किंग अशी पद्धत अवलंबावी 3. जवळच्या बाजारात जाण्यासाठी पायी किंवा सायकलने जावे, आवश्यक खरेदीसाठी जवळच्या जवळ बाजारात जावे, खरेदीला जाण्यासाठी वाहनाचा वापर टाळावा

टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 2 दुचाकी – केवळ चालक

नाईट कर्फ्यू 

संपूर्ण महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी पाच वाजेपर्यंत कडकडीत बंद राहील. यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. याशिवाय नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास बंदी राहील. रात्री 9 ते सकाळी 5 यावेळतही जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू असेल.

65 पेक्षा जास्त वयोगटातील आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांनी घरातच राहावे.

(Mission Begin Again Phase Three Maharashtra Unlock)

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.