Pune Lockdown | सरकारनं अफू घेऊन निर्णय घेतलाय का? पुणे लॉकडाऊनवर मनसेचा सवाल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यात लागू केलेल्या लॉकडाऊनवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे (MNS raise question on Pune Lockdown).

Pune Lockdown | सरकारनं अफू घेऊन निर्णय घेतलाय का? पुणे लॉकडाऊनवर मनसेचा सवाल
Follow us
| Updated on: Jul 13, 2020 | 4:25 PM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यात लागू केलेल्या लॉकडाऊनवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे (MNS raise question on Pune Lockdown). सरकारनं अफू घेऊन पुण्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे का? असा खोचक सवाल मनसेने विचारला आहे. मनसेचे पुणे शहर प्रमुख अजय शिंदे यांनी याबाबत अधिकृतपणे मनसेची भूमिका निवेदनातून मांडली आहे. यात त्यांनी लॉकडाऊनमुळे नागरिक हवालदिल झाल्याची तक्रारही केली.

मनसेने म्हटलं आहे, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपासून (13 जुलै) पुणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयातून सरकार किती गोंधळलेले आहे हे स्पष्ट होते. राज्याचे मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाही. सरकार नक्की कोण चालवत आहे? हे कोणालाच कळत नाही.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“बदल्यातील मानापमान नाट्य आणि नगरसेवक देवाणघेवाण यात सरकारमधील प्रमुख पक्ष व्यस्त आहेत. अशावेळी राज्यातील प्रमुख शहरतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे राज्यकर्त्यांचे लक्षच नव्हते. पुणे शहरात रोज सरासरी 20 मृत्यू आणि रोज 600 ते 1000 रुग्ण वाढ होत आहे. असं असताना सरकार नेमकं कशाच्या अमलाखाली झोपलं होतं?” असा सवाल मनसेने केला.

मनसेने आपल्या निवदेनात लॉकडाऊनवर सडकून टीका केली. मनसेने म्हटलं, “लॉकडाऊन काढून कोरोना संपलाच आहे अशा थाटात सगळं शहर सत्ताधाऱ्यांनी मैदान खुलं केलं. शहरात कोरोना वाढत असताना वाढती गर्दी कमी करण्याऐवजी स्थानिक कार्यकर्ते वेगळ्याच कारवाईत गुंग होते. रस्त्यावर थुंकल्याने कोरोना वाढेल असं सांगत थुंकणाऱ्यांवर 1000 रुपये दंड केला जात होता. त्याचवेळी पानपट्ट्यांमधून खुलेआम गुटखा विक्री होत होती. गर्दी करु नका असं सांगताना चहाचे ठेले सर्व ठिकाणी सुरु होते. यासारखे अनेक प्रकार शहरात सुरु राहिल्याने गर्दीत वाढ होत राहिली. ही वाढ कोरोनात रुपांतरीत होत होती.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“शहरातील रुग्णांना रुग्णालयात जागा नाही. व्हेंटिलेटर मिळणं मुश्किल झालं असताना सत्ताधारी कशाच्या धुंधित होते? हा लॉकडाऊन जनतेला आर्थिक अडचणीत आणणारा आहे. व्यावसायिक तर लॉकडाऊनमुळे हवालदिल होतील आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे कामगार त्यापेक्षा अधिक अडचणीत येतील,” असंही मनसेने या निवेदनात म्हटलं आहे.

हेही वाचा :

…तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या : चंद्रकांत पाटील

मोदी-शाह दिल्लीत तर फडणवीस महाराष्ट्रात नवेच, ‘नया है वह’ वरुन संजय राऊतांचा पलटवार

RSS ने धारावी कोरोनामुक्त केली असेल, तर नागपुरात संघाचं मुख्यालय, तिथे कोरोनाचा कहर कसा? : राजू शेट्टी

MNS raise question on Pune Lockdown

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.