MS Dhoni | निवृत्तीनंतर महेंद्रसिंग धोनी कडकनाथ कोंबड्यांच्या व्यवसायात, 2 हजार पिलांची ऑर्डरही दिली
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला महेंद्रसिंग धोनी रांचीमध्ये झाबुआच्या कडकनाथ कोंबड्याचा व्यवसाय करणार आहे.
रांची : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला महेंद्रसिंग धोनी रांचीमध्ये झाबुआच्या कडकनाथ कोंबड्याचा व्यवसाय करणार आहे. यासाठी धोनीने अधिकृतपणे मध्य प्रदेशमधून झाबुआच्या कडकनाथ कोंबड्यांच्या 2 हजार पिल्लांची ऑर्डर देखील दिलीय. यासाठी त्याने झाबुआच्या आदिवासी शेतकऱ्यांना याचं पेमेंटही केलंय (MS Dhoni going to do Kadaknath cock business after retirement).
कॅप्टन कूल आणि दिग्गज क्रिकेट खेळाडू महेंद्रसिंग धोनी लवकरच रांचीमध्ये मध्यप्रदेशमधील झाबुआचे कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय करताना दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने सेंद्रीय शेती आणि कडकनाथ कोंबड्यांचं कुकुटपालन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कुकुटपालनासाठी धोनीने आपल्या रांचीमधील व्हेटरनरी कॉलेजमधील प्राध्यापक मित्राच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधून झाबुआचे आदिवासी शेतकरी विनोद मेडा यांना अॅडव्हान्स देऊन 2 हजार कडकनाथ कोंबड्यांच्या पिल्लांची ऑर्डर दिली आहे. याची डिलिव्हरी 15 डिसेंबरपर्यंत होणं अपेक्षित आहे.
धोनेने दिलेली ही ऑर्डर मिळाल्याने झाबुआचे आदिवासी शेतकरी विनोद मेडा खूपच आनंदी आहेत. जेव्हा या कडकनाथ पिल्लांची डिलिव्हरी करायला रांचीला जाऊ तेव्हा धोनीची देखील भेट होईल, अशी आशा विनोद मेडा लावून बसले आहेत.
धोनीने दिलेल्या या कडकनाथ कोंबड्यांच्या ऑर्डरविषयी बोलताना झाबुआचे कडकनाथ कोंबडा संसोधन केंद्राचे संचालक डॉक्टर आय. एस, तोमर म्हणाले, “धोनीने आपल्या मित्रांमार्फत आमच्याशी संपर्क केला. मात्र, आमच्याकडे कडकनाथ कोंबड्यांची पिल्ल शिल्लक नसल्याने आम्ही त्यांना झाबुआमधील थांदलाच्या आदिवासी शेतकऱ्याशी संपर्क करण्यास सांगितले. हा शेतकरी कडकनाथ कोंबड्यांचं कुकुटपालन करतो.”
कडकनाथ कोंबडा मध्य प्रदेशच्या झाबुआची ओळख आहे. या गावाला झाबुआच्या कडकनाथ कोंबड्याच्या रुपात भारत सरकारकडून भौगोलिक ओळखीचं प्रमाणपत्र (जीआय टॅग) देखील मिळालेलं आहे. हा कोंबडा रंगाने तर काळा असतोच, सोबत त्याचं रक्त, हाडं आणि मांस देखील काळे असते. हा कोंबडा आपल्या चविष्ट मांसासाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे या कोंबड्याचं मांस फॅट आणि कोलेस्ट्रॉल फ्री असते.
संबंधित बातम्या :
IPL 2020 : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील चेन्नईचे आव्हान संपुष्टात, धोनीच्या नावे खराब विक्रमाची नोंद
आयपीएलमधून निवृत्ती नाहीच, चेन्नईसाठी खेळत राहणार, धोनीचा निर्धार
Ruturaj Gaikwad | धोनीचा ‘हा’ सल्ला उपयुक्त ठरला, ऋतुराज गायकवाडकडून कॅप्टन कूलचे आभार
MS Dhoni going to do Kadaknath cock business after retirement