नुसता फोर, सिक्सचा पाऊस, पाकिस्तानात T20 च्या एका मॅचमध्ये 515 धावा, आफ्रिदीने घेतली हॅट्ट्रिक, VIDEO

Pakistan Super League च्या एका मॅचमध्ये 515 धावांचा पाऊस पडला. आफ्रिदीने PSL-8 मध्ये पहिली हॅट्ट्रिक घेतली. ज्या मॅचमध्ये 515 धावा बनल्या, त्याच सामन्यात त्याने PSL-8 मधील पहिली हॅट्ट्रिक घेतली.

नुसता फोर, सिक्सचा पाऊस, पाकिस्तानात T20 च्या एका मॅचमध्ये 515 धावा, आफ्रिदीने घेतली हॅट्ट्रिक, VIDEO
psl Image Credit source: VideoGrab
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 10:18 AM

PSL 2023 : सध्या क्रिकेट विश्वात पाकिस्तान सुपर लीगची चर्चा आहे. या लीगमध्ये धावांचा पाऊस पडतोय. शनिवारी एका मॅचमध्ये धावा झाल्या, तशा विकेटही पडल्या. या मॅचमध्ये धावांचा इतका पाऊस पडला की, T20 क्रिकेटमध्ये एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित झाला. 21 वर्षांचा एक मुलगा PSL-8 मध्ये लीडिंग विकेटटेकर बनलाय. आम्ही बोलतोय, अब्बास आफ्रिदीबद्दल. ज्या मॅचमध्ये 515 धावा बनल्या, त्याच सामन्यात त्याने PSL-8 मधील पहिली हॅट्ट्रिक घेतली.

मुल्तान सुल्तांस आणि क्वेटा ग्लॅडिएटर्समध्ये सामना होता. मुल्तान सुल्तांसने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 3 विकेट गमावून 262 धावांचा डोंगर उभारला. PSL च्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

आफ्रिदीची हॅट्ट्रिक

या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या क्वेटा ग्लॅडिएटर्सने पूर्ण जोर लावला. मुल्तान सुल्तांसचा गोलंदाज अब्बास आफ्रिदीने आधी हॅट्ट्रिक घेतली. त्यानंतर आपल्या पंचने कमजोर केलं. क्वेटाच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 253 धावा केल्या.

विजयात दोघांच महत्त्वाच योगदान

मुल्तान सुल्तांसने या मॅचमध्ये 9 धावांनी विजय मिळवला. मुल्तान सुल्तांसच्या विजयात उस्मान खान आणि अब्बास आफ्रिदीने महत्त्वाची भूमिका बजावली. उस्मान खानने PSL च्या इतिहासातील वेगवान शतक ठोकलं. अब्बास आफ्रिदीने हॅट्ट्रिकसह पाच विकेट घेतल्या.

आफ्रिदीने 2 ओव्हरमध्ये घेतली हॅट्ट्रिक

अब्बास आफ्रिदीने पावर प्लेच्या अखेरच्या ओव्हरमध्ये पहिला विकेट घेतला. त्यानंतर 15 व्या ओव्हरमध्ये दुसरा विकेट घेतला. 17 व्या आणि 19 व्या ओव्हरमध्ये त्याने आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. 17 व्या ओव्हरच्या अखरेच्या दोन चेंडूंवर त्याने दोन विकेट काढले. त्यानंतर 19 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकेट काढून आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध हॅट्ट्रिकसह अब्बास आफ्रिदी पाकिस्तान सुपर लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनलाय. त्याने PSL-8 मध्ये आतापर्यंत 9 सामन्यात 22 विकेट घेतले आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.