प्रेमात अडथळा ठरत असल्याने नवऱ्याचाच केला खून; दीर-भावजयीला बेड्या

प्रेमात अडथळा ठरत असलेल्या नवऱ्याचाच खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Murder Baramati Brother Wife)

प्रेमात अडथळा ठरत असल्याने नवऱ्याचाच केला खून; दीर-भावजयीला बेड्या
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 8:26 PM

पुणे : प्रेमात अडथळा ठरत असलेल्या नवऱ्याचाच खून केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यात (Murder in Baramati) घडली आहे. हा प्रकार बारामती तालुक्यातील कुतळवाडी येथे घडला. अंगाला दगड बांधून विहिरीत ढकलून देऊन हा खून करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात दीर-भावजयीला अटक करण्यात आली आहे. रामदास महानवर असे मृताचे तर गणेश महानवर आणि मृत रामदास यांची पत्नी ताई असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Murder in Baramati by Brother and Wife)

मिळालेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर रोजी आरोपी गणेश महानवर यांनी भाऊ रामदास महानवर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दिली होती. दाखल तक्रारीनुसार तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान, रामदास यांचा मृतदेह त्यांच्या पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत एका विहिरीत आढळला.

रामदास यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने पोलिसांना आपल्या तपासाला वेग दिला. त्यांनी शक्य तितक्या नागरिकांची चौकशी केली. तसेच तक्रारदार गणेश आणि मृताची पत्नी ताई यांचीही चौकशी केली. चौकशीदरम्यान या दोघांच्याही जबाबात पोलिसांना विसंगती आढळली. त्यानंतर या दोघांवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी दोघांना केंद्रस्थानी ठेऊन तपासाला सुरुवात केली. दरम्यान, सखोल तपास केल्यानंतर खून झालेल्या रामदास यांचा भाऊ गणेश आणि त्यांची पत्नी ताई या दोघांनीच प्रेम प्रकरणातून त्यांचा खून केल्याचे समोर आले. तशी कबुली आरोपी गणेश आणि ताई यांनी दिली आहे.

दरम्यान, दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. रामदास यांच्या हत्येमुळे त्यांचा मित्रपरिवार आणि इतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या :

मुलाच्या हव्यासापोटी सव्वा महिन्याच्या चिमुरडीचा खून, निर्दयी मातेला बेड्या

तरुणाचा मृतदेह डिक्कीत आढळल्याने खळबळ; मित्रानेच पैशांमुळे खून केल्याचा संशय

नाशकात गॅरेज मालकाचा खून, पाच तासात पोलिसांनी मारेकऱ्याला पकडलं

(Murder in Baramati by Brother and Wife)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.