लसीकरण नसेल तर पगार नाही, प्रवेश नाही! नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे सरकारी कार्यालयांना आदेश
नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र, राज्य, निमशासकीय कार्यालयांना लसीकरणाबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत. लसीकरण नसेल तर पगार नाही, प्रवेश नाही. सवलत, लाभ, योजना आदींमध्ये सहभागासाठी लसीकरण अनिवार्य असेल. त्यासाठी 30 नोव्हेंबरच्या आत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ठ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
नागपूर : कोरोनाची प्रादुर्भाव कमी झाल्याचं चित्र असलं तरी कोरोना विषाणूपासून लोकांच्या रक्षणासाठी लसीकरण मोहीम अधिक वेगानं राबवण्यात येत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील मुख्यमंत्री आणि 40 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून लसीकरणाचा आढावा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या आढावा बैठकीला उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हाधिकारी विमला आर. यांनी लसीकरणासाठी एक मोठा निर्णय घेतलाय. (Important orders of Nagpur District Collector to all government employees for corona vaccination)
नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र, राज्य, निमशासकीय कार्यालयांना लसीकरणाबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत. लसीकरण नसेल तर पगार नाही, प्रवेश नाही. सवलत, लाभ, योजना आदींमध्ये सहभागासाठी लसीकरण अनिवार्य असेल. त्यासाठी 30 नोव्हेंबरच्या आत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ठ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोना विरुद्ध लढ्यात लसीकरण हे महत्वाचे शस्त्र आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी डोस पूर्ण केल्याशिवाय वेतन नाही. कॉलेज प्रवेश, परीक्षेतील सहभागासाठीही लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहेत. त्यासाठी मिशन मोडवर कारम करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचन भवनमध्ये आज या संदर्भात केंद्र, राज्य, शासकीय आणि निमशासकीय अशा सर्व आस्थापनांच्या विभाग प्रमुखांची यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
फटाके नको, दिवाळी पहाट कार्यक्रमात कोरोना नियम पाळा
दिवाळी उत्सव घरगुती आणि मर्यादित स्वरूपात साजरा करावा. यावर्षी फटाके फोडणे टाळावे. तसेच दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करा. दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिले आहेत.
#नागपूर दिवाळीत फटाके फोडणे टाळा, घरगुती उत्सव साजरा करा – विमला आर.@vimshine @NitinRaut_INC @SunilKedar1111 @InfoVidarbha @MahaDGIPR
— DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR (@InfoNagpur) October 29, 2021
पंतप्रधान मोदींचा इशारा
दरम्यान, आज घेतलेल्या लसीकरणाच्या आढावा बैठकीत पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या. “लसीकरणात आतापर्यंत झालेली प्रगती ही तुमच्या मेहनतीमुळे आहे. प्रशासनातील प्रत्येक सदस्य, आशा कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी मैल पायी चालत दुर्गम ठिकाणी लसीकरण केले. पण 100 कोटी डोस झाले असले तरी जर आपण हलगर्जीपणा केला, तर एक नवीन संकट येऊ शकते,” असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधिकाऱ्यांना दिला आहे.
इतर बातम्या :
अनिल देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत!, परमबीर सिंहांच्या प्रतिज्ञापत्रानं मोठी खळबळ
Important orders of Nagpur District Collector to all government employees for corona vaccination