Nagpur Corona | तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे नागपुरात मोठा धोका टळला

क्वारंटाईन केलेल्यांपैकी तब्बल 43 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे या 43 जणांपासून इतरांना संसर्ग (Nagpur Corona Virus Threat) होण्यापासून टळलं.

Nagpur Corona | तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे नागपुरात मोठा धोका टळला
Follow us
| Updated on: May 07, 2020 | 6:52 PM

नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांच्या निर्णयाने (Nagpur Corona Virus Threat) नागपूरवरील मोठं संकट टळलं आहे. तुकाराम मुंढे यांनी विरोध होत असतानाही नागपुरातील मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा परिसरातील अनेकांना क्वारंटाईन केलं. या क्वारंटाईन केलेल्यांपैकी तब्बल 43 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे या 43 जणांपासून इतरांना संसर्ग (Nagpur Corona Virus Threat) होण्यापासून टळलं.

नागपुरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा परिसरातील 43 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्वांना आधीच क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं. क्वारंटाईन असल्यामुळे या 43 जणांपासून अनेकांना कोरोनाचा संसर्ग टळला आहे. नागपुरातील मोमीनपुऱ्यातून पाच दिवसांत तब्बल 600 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. तर, सतरंजीपुरा परीसरातून यापूर्वीच जवळपास 1700 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. या दोन्ही परिसरातील एकूण 2300 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. संसर्गाचा धोका दिसताच आणखी काही लोकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे.

नागपुरातील सतरंजीपुरा परिसर मध्य भारतातील ‘कोरोना’ साखळीचं सर्वात मोठं केंद्रबिंदू ठरत आहे. एकट्या सतरंजीपुरा परिसरात कोरोना रुग्णांनी शंभरी गाठली आहे. या परिसरातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या 43 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागपुरात कोरोना बाधितांचा आकडा 182 वर पोहोचला आहे.

मध्य भारतात एकाच परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळणारं सतरंजीपुरा हे एकमेव ठिकाण आहे. या परिसरातील कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी नागपूर महानगरपालिका युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे.

68 वर्षीय कोरोनाबाधित मृतकाच्या संपर्कात आल्याने सतरंजीपुरा परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने 60 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली (Nagpur Corona Virus Threat). त्यानंतर इथली कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली.

सतरंजीपुरा परिसरात कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी मनपाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहे. या भागातील साधारण 1700 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. इथल्या नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या भागातली सर्व गल्ल्या सील करण्यात आल्या आहेत.

मिशन सतरंजीपुरा मास्टर प्लॅनमधील उपाययोजना

  • सतरंजीपुरामधील 1700 च्या जवळ लोकांना करण्यात आलं क्वारंटाईन
  • टीबी पेशंट शोधून त्यांच्यावर उपचार
  • गरोदर मातांची तपासणी
  • हाय रिस्क असणाऱ्यांची कडक तपासणी
  • सतरंजीपुरा परिसरात सीआरपीएफ आणि जीआरपीचे 200 जवान तैनात

सतरंजीपुरा हा भाग दाटीवाटीचा आणि मोठ्या लोकसंख्येचा आहे. त्यामुळे प्रशासनाने तयार केलेल्या मास्टर प्लॅननुसार या भागाला सील करत नागरिकांना क्वारंटाईन (Nagpur Corona Virus Threat) करण्यात आले.

VIDEO : 

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनदरम्यान लवकरच Zomato कडून घरपोच दारुची डिलिव्हरी

नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, 24 तासात 63 जणांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 531 वर, दोन दिवसात 74 पोलीस कोरोनाग्रस्त

नागपुरात एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण, 11 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.