कोरोना काळात घरात राहून कंटाळलेल्या फुलप्रेमींसाठी नागपूरच्या हिसलोप कॉलेजमध्ये फुलांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचं वैशिष्ट्यं म्हणजे यात 100 पेक्षा जास्त शेवंती फुलाच्या जाती पाहायला मिळत आहे.
त्यासोबत मनाला मोहित करणारी इतर फुल सुद्धा या प्रदर्शनात एकाच ठिकाणी पाहायला मिळत आहे.
हिसलोप कॉलेजचा बॉटणी विभाग गेल्या 17 वर्षापासून याचे प्रदर्शनाचे आयोजन करतो.
मात्र कोरोनामुळे यंदा फुलांचे प्रदर्शन पाहायला मिळेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती.
पण विभागाने नियमांचं पालन करत नागरिकांसाठी हे प्रदर्शन भरवले.
विशेष म्हणजे या प्रदर्शनाला नागरिकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला आहे.