नागपुरात कोरोनामुळे दिवसाला 60 रुग्णांचा मृत्यू, तरीही गतवर्षीच्या तुलनेत मृतांचा आकडा घटला
मृत्यूची संख्या कमी झाली असली तरी अजूनही नागपूरकरांच्या मनात कोरोनाची दहशत कायम आहे. (Nagpur Last two years death Statistics)
नागपूर : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. नागपुरात दर दिवशी साधारण 50 ते 60 पेक्षा अधिक कोरोना मृत्यू होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे कोरोना काळात झालेल्या मृत्यूची आकडेवारी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कायद्यात ही माहिती उघड झाली आहे. (Nagpur Last two years death Statistics)
नागपूर शहरात कोरोनाची दहशत निर्माण झाली. दर दिवशी वाढणाऱ्या मृत्यूंची संख्या ऐकून नागरिक भयभीत झाले आहेत. कोरोना काळात अनेक ठिकाणी स्मशानभूमीत मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नव्हती. आता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. मृत्यू संख्या कमी झाली असली तरी अजूनही नागपूरकरांच्या मनातील दहशत कायम आहे.
मात्र कोरोना काळात वाढलेली आकडेवारी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी होती अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. या माहितीवर विश्वास ठेवणे अनेकांना अशक्य वाटत आहे. मात्र तरीही कोरोना काळात झालेल्या मृतांची संख्या ही गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच असल्यांचं समोर आलं आहे. नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते वेदप्रकाश आर्य यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मागील दोन वर्षातील मृत्यूची आकडेवारी
महिना मृत्यू
वर्ष 2019 – वर्ष 2020
⏺️एप्रिल 2159 – 1527
⏺️मे 2344 – 1399
⏺️जून 2395 – 2049
⏺️जुलै 2198 – 2220
⏺️ऑगस्ट 2327 – 2595
नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते वेदप्रकाश आर्य यांनी लोकांच्या मनात निर्माण होणारी भीती दूर करण्यासाठी ही माहिती मागवली होती. त्यात नागपूरकरांना काहीसा दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. पण येणाऱ्या काळात कोरोनापासून सावध राहण्याची गरज आहे. तेव्हाच हा मृत्यूदर रोखणं शक्य होईल. (Nagpur Last two years death Statistics)
संबंधित बातम्या :
रात्री अंधारात मासे पकडण्यासाठी नदीवर, काका-पुतण्याचा बुडून मृत्यू
Taimur Ali Khan | ‘रामायण’ बघायला आवडते, ‘पापा’ सैफकडून तैमूरच्या खास गोष्टी शेअर!