…तर संपूर्ण नागपूर शहर कोविडच्या विळख्यात, तुकाराम मुंढेंकडून भीती व्यक्त

नागपुरात काल दिवसभरात (10 जून) तब्बल 86 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन महिन्यात एकाच दिवशी कोरोना रुग्णवाढीचा हा उच्चांक आहे. (Nagpur Tukaram Mundhe Corona Patients)

...तर संपूर्ण नागपूर शहर कोविडच्या विळख्यात, तुकाराम मुंढेंकडून भीती व्यक्त
Follow us
| Updated on: Jun 11, 2020 | 10:53 AM

नागपूर : “नागपूरकरांनी लॉकडाऊनचे नियम न पाळल्यामुळे शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. असेच सुरु राहिल्यास पूर्ण नागपूर शहर कोविडच्या विळख्यात जाईल” अशी भीती नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली. (Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe on increasing Corona Patients in City)

“नागपूर शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, काल दिवसभरात 86 कोरोना रुग्ण वाढले. नागपूरच्या रहिवाशांनी लॉकडाऊनचे नियम न पाळल्यामुळे शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहेत, परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काळात कोरोनाचा डबलिंग रेट काही दिवसांवर येईल आणि पूर्ण नागपूर शहर कोविडच्या विळख्यात जाईल’ अशी भीती तुकाराम मुंढे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

जनतेची साथ मिळाली नाही, तर शहर हाताच्या बाहेर जाईल, असं म्हणत नियम तोडणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही मुंढे यांनी दिला. प्रत्येक नागपूरकराला घराबाहेर पडताना मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अशा कोविड 19 च्या गाईडलाईन पाळण्याची विनंती तुकाराम मुंढे यांनी केली. गरज नसताना घराबाहेर पडणे टाळा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

हेही वाचा : राज्यात दिवसभरात तब्बल 3,254 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, आकडा 94 हजारांच्या पार

नागपुरात काल दिवसभरात (10 जून) तब्बल 86 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन महिन्यात एकाच दिवशी कोरोना रुग्णवाढीचा हा उच्चांक आहे. नाईक तलाव-बांगलादेश परिसरात काल तब्बल 71 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 863 वर पोहोचली आहे.

जून महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात तब्बल 323 कोरोना रुग्ण वाढले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. हिंगणा तालुक्यातील इसासनी भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काल या परिसरातील तब्बल सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

नागपुरातील कोविड रुग्णालयातून काल दिवसभरात 22 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत नागपुरातून 543 रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत.

(Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe on increasing Corona Patients in City)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.