AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरकरांना दिलासा, हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुऱ्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त!

विशेष म्हणजे हॉटस्पॉट ठरलेल्या नागपुरातील सतरंजीपुऱ्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (Nagpur Satranjipura hotspot Corona free)

नागपूरकरांना दिलासा, हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुऱ्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त!
| Updated on: May 25, 2020 | 4:45 PM
Share

नागपूर : महाराष्ट्रात अनेक ग्रामीण भागातही कोरोनाने हात-पाय पसरायला (Nagpur Satranjipura hotspot Corona free)  सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागपूर शहरात परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तसेच बरं होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र रोज वाढणारी रुग्णांची संख्या चिंतादायक आहे. तसेच आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुऱ्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

नागपुरात कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे. नागपूर शहरासोबत आता ग्रामीण (Nagpur Satranjipura hotspot Corona free) भागातही कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली. नागपूर शहरात कोरोना रुग्णाची संख्या रोज वाढत असून आज 2 रुग्ण वाढले तर एकाचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नागपुरात कोरोनाबळींची संख्या 8 वर पोहोचली आहे.

नागपुरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 426 वर पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत असून 341 चा आकडा गाठला आहे.

नागपुरात हॉटस्पॉटची परिस्थिती काय?

विभाग – रुग्ण – मृत्यू- कोरोनामुक्त

  • सतरंजीपुरा – 103 (1) 102
  • मोमीनपुरा – 188 (2) 149
  • गड्डीगोदाम – 21 (1) 00
  • टिमकी – 13 (0) 07
  • पार्वती नगर – 3 (1) 02

नागपूर ग्रामीणमध्ये किती रुग्ण?

परिसर – रुग्ण

  • बुटीबोरी – 2
  • दहेगाव – 1
  • कळमेश्वर तालुका – 1
  • कामठी – 1

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना

पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येताच परिसर सील नागरिकांना क्वारंटाईन करुन फैलाव थांबविणे संपूर्ण परिसर सॅनिटाईझ करणे परिसरात आरोग्य तपासणी क्षय रोग तपासणी गर्भवती महिलांची तपासणी परिसरात पोलीस आणि एस आरपीएफ तैनात नागरिकांना बाहेर पडण्यास किंवा त्या भागात कोणाला जाण्यास मज्जाव

नागपुरात सद्यस्थितीत 426 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील 341 जणांनी कोरोनावर मात केली असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपुरातील हॉटस्पॉटचा भाग हा संवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्या भागात पोलिसांसोबतच सीआरपीएफ तैनात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

Nagpur Corona | नागपुरात ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’ यशस्वी, जवळपास 75 टक्के रुग्णांची कोरोनावर मात

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात 50 हजारांचा टप्पा पार, दिवसभरात सर्वाधिक 3,041 नवे कोरोना रुग्ण

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.