AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीक पेऱ्याच्या नोंदी वाढवण्यासाठी नांदेड प्रशासनाचा अभिनव उपक्रम, गाव स्तरावर यंत्रणा

शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती नसल्याने पिकांची नोंदणी ही शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून कारण्याची मागणी ही राज्य मंत्री बच्चू कडू यांनीही केले होती. या मागणीची पूर्तता करण्यात आली नसली तरी या पिक पाहणीच्या तांत्रिक बाबींची माहिती शेतकऱ्यांना मिळावी या उद्देशाने आता प्रशासकीय अधिकारी गावागावात जाऊन जनजागृती करीत आहेत.

पीक पेऱ्याच्या नोंदी वाढवण्यासाठी नांदेड प्रशासनाचा अभिनव उपक्रम, गाव स्तरावर यंत्रणा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 11:05 AM

लातूर : ई-पीक पाहणीच्या (E-Pik Pahani) माध्यमातून शेतकऱ्य़ांना स्व:ता आपल्या शेतातील पिकांची नोंद ही मोबाईलवरून करावी लागणार आहे. मात्र, ही मोहीम सुरु झाल्यापासूनच यावर शेतकरी नेते हे टीका करीत आहेत. (Nanded) शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती नसल्याने पिकांची नोंदणी ही शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून कारण्याची मागणी ही राज्य मंत्री बच्चू कडू यांनीही केले होती. या मागणीची पूर्तता करण्यात आली नसली तरी या पिक पाहणीच्या तांत्रिक बाबींची माहिती शेतकऱ्यांना मिळावी या उद्देशाने नांदेड येथील आता प्रशासकीय अधिकारी गावागावात जाऊन जनजागृती करीत आहेत.

शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकाची नोंद शासनाकडे होण्याच्या उद्देशाने ही ई- पिक पाहणी या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही माहिती भरायची आहे. मात्ऱ किचकट प्रक्रियामुळे या नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतल्याचे सांगितले जात आहे. परंतू, बांधावरची स्थिती ही वेगळीच असल्याचे म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या पिकांची नोंद ही प्रशासकीय यंत्रणेकडून होण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. आता या माध्यमातून नोंदणीकरीता केवळ आठ दिवसाचा कालावधी राहिलेला आहे.

शेतकऱ्यांनी अॅपच्या माध्यमातून पिकाची माहिती भरण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात एक विशेष मोहिम राबवली जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून एका दिवसामध्ये 10 हजार शेतकऱ्यांच्या नोंदीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. आता प्रत्यक्ष प्रशासकीय यंत्रणा ही शेतकऱ्यांच्या पिकाची माहिती घेत नसली तरी अधिकाअधिक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तालुक्यानुसार महसूलच्या कर्मचाऱ्यांना हे उद्दीष्ट देण्यात आले आहे.

पिक नोंदणीसाठी प्रशासकीय यंत्रणा

ई-पिक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीकाची माहिती अॅपमध्ये भरायची असली तरी याबाबत जनजागृती होणे आवश्यक होते. अशाप्रकारे जनजागृती ग्रामीण भागात झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. परिणामी नांदेड जिल्ह्यात पीक पेऱ्याची नोंदणी ही समाधानकारक झालेली नाही. जिल्ह्यात 4 लाख 59 हजार शेतकऱ्यांची संख्या आहे. आता पर्य़ंत केवळ 1 लाख 19 हजार शेतकऱ्यांनीच नोंद केलेली आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी डॅा. विपीन यांनी ही विशेष मोहिम राबवण्याच्या सुचना ह्या केलेल्या आहेत.

प्रत्येक गावात 10 स्वयंसेवक

आता ई-पीक पाहणीच्या माध्यमातून माहिती भरण्यासाठी केवळ आठ दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे अधिक शेतकऱ्यांच्या सहभागाच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यात मंगळवार पासून मोहिम राबवली जात आहे. यामध्ये गावात 10 स्वयंसेवक जे ह्या अॅपची योग्य माहिती शेतकऱ्यांना देणार आहेत. त्यामुळे पिकाची नोंद करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढेल असा आशावाद आहे.

‘अॅप’ वरअशा पध्दतीने करा पिकाची नोंदणी

* शेतकऱ्यांनी प्ले स्टोअर मधून ‘ई-पीक पाहणी’ असं नाव टाकून हे अॅप डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. त्यानंतर हे अॅप ओपन केल्यानंतर ई-पीक पाहणी नावाचे होम पेज ओपन होईल. यामध्ये जमाबंदी आयु्क्त व संचालक, भूमी अभिलेख कार्यालय, महसूल विभाग, महाराष्ट्र शासन. ई-पाक पाहणी प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे असं नमूद केलंल असेल.

* याला डावीकडे सरकवल्यास हे अॅप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल. पुन्हा एकदा डावीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल, त्या दिलेल्या असतील. जसं की सातबारा उतारा, 8-अ इत्यादी. त्यानंतर येथे असलेल्या पुढं या पर्यायावर क्लिक करायंच आहे. * नविन खातेदार नोंदणी करुन घ्यावयाची आहे. यामध्ये आपला जिल्हा, तालुका आणि गावाची निवड करयाची आहे. त्यानंतर खातेदारमध्ये पहिले नाव, मधले नाव, अडनांव आणि गट क्रमांक टाकायचा आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याला आपले नाव समोर येते. त्यानंतर खातेक्रमांक तपासून आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो पुन्हा बदलता येणार नाही.

* त्यानंतर मोबाईलवर चार अंका पासवर्ड येईल तो कायम लक्षात ठेवावा लागणार आहे. कारण या अॅपमध्ये तोच पासवर्ड लागणार आहे तो एसएमएस द्वारे पाठवला जाईल. यानंतरच तुमची नोंदणी यशस्वी होणार आहे. यानंतर अॅप हे पूर्णपणे बंद करुन चालू करायचे आहे. * अॅप पुन्हा चालू केल्यानंतर ई-पीक पाहणीच्या नोंदणीला येथूनच खरी सुरवात होते. पुन्हा तुम्हाला खातेदार म्हणजे तुमचे नाव निवडावे लागेल. मॅसेजद्वारे आलेला पासवर्ड येथे नमूद करायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊन परीचयमध्ये खातेदाराचा फोटो अपलोड करायचा त्यानंतर दिलेली माहिती भरून सबमिट करायचे.

* त्यानंतर होममध्ये येऊन पिकाची माहिती नोंदवा असा एक फॅार्म येतो. यामध्ये खातेक्रमांक नंतर गट क्रमांक, जमिनीचे क्षेत्र हे हेक्टरमध्ये भरायचे यानंतर हंगाम निवडायचा म्हणजे खरीप की संपूर्ण वर्ष ते निवडायचे, त्यानंतर पिक पेरणीसाठीचे क्षेत्र किती याचा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर पिकाचा वर्ग यामध्ये जे आपलं मुख्य पिक आहे तेच निवडायचे यामध्ये दुय्यम पीकाचाही उल्लेख करता येणार आहे. * त्यानंतर दिलेल्या पर्यापैकी तुमचं कोणतं पिक ते निवडायचे आहे. निवडलेल्या त्या पिकाचे क्षेत्र भरायचे.. त्यानंतर सिंचनाचे साधन काय आहे त्याचा उल्लेख करायचा त्यानंतर ठिबक पध्दती कशी आहे याची दिलेल्या पर्यातून निवड करायची..त्यानंतर पिक लागवडीची तारीख याची नोंद करायची.

* ही सगळी माहिती भरुन झाली की आपण वरती जे मुख्य पीक सांगितले आहे त्याचा देण्यात आलेल्या कॅमेराच्या पर्यायतून फोटो काढायचा आणि तो फॅार्म सबमिट करायचा आहे. सबमिट झाल्यानंतर पुन्हा होमवर यायचं ही नोंदवलेली माहिती केवळ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाली.. ती बघायची असेल तर पुन्हा पिकाची माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करायचे आहे. यामध्येही पिकाची माहिती यावर क्लिक करयाचे यामध्ये तुम्ही भरलेली माहिती दिसेल जी मोबाईलमध्ये सेव्ह झालेली असेल ही माहिती संबंधित सर्वरला पाठवण्यासाठी अपलोड या बटनाला क्लिक करायचे आहे.

* त्यानंतर आलेल्या दोन पर्यापैकी परिचय माहिती क्लिक करुन माहीती अपलोड झालेली पहायला मिळते त्याच प्रमाणे पिक माहितीवरती क्लिक करुन अपलोड करायचे आहे…अशा प्रकारे ‘ई-पिक पाहणी’ या अॅपद्वारे आपल्याला पिकाची माहिती भरता येते.

* आता तुम्हाला दुसऱ्या एखाद्या गटातल्या किंवा इतरही पिकांची नोंद करायची असेल तर + या बटनावर क्लिक करून वरी केलेली प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे.. अशाचप्रकारे या अॅपवरून तुम्ही कायम पडिक जमिन, बांधावरची झाडंही नोंदवू शकता. या भरलेल्या माहिती छाननी तलाठी कार्यालयात केली जाईल आणि मग सातबाऱ्यावर या पिकांची नोंद होईल. (nanded-administrations-innovative-initiative-to-increase-crop-pea-records)

इतर बातम्या :

2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, चंद्रकातदादांची धमकी, ‘फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढू’ पटोलेंचं प्रत्युत्तर

शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, उद्धव ठाकरेंचा बिनीचा शिलेदार आक्रमक

श्रावण संपताच महागाईची फोडणी; चिकन 10 रुपयांनी तर अंडी एक रुपयांनी महागली

दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव.
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी.
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री.
भारताच्या स्ट्राईकनंतर संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला
भारताच्या स्ट्राईकनंतर संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला.
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं.
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?.
Operation Sindoor : देशाचा दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला?
Operation Sindoor : देशाचा दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला?.
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला.
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा.
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ.