AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये दोन नवजात बाळांना कोरोनाची बाधा, बाधितांचा आकडा 693 वर

नाशिक जिल्ह्यात गेल्या 48 तासात दोन नवजात बाळांना कोरोना विषाणूची (Nashik New Born baby Corona) लागण झाली आहे.

नाशिकमध्ये दोन नवजात बाळांना कोरोनाची बाधा, बाधितांचा आकडा 693 वर
| Updated on: May 12, 2020 | 3:38 PM
Share

नाशिक : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 23 हजार 401 वर (Nashik New Born baby Corona) पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना गेल्या 48 तासात दोन नवजात बाळांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पालकांची धास्त वाढली आहे. या नवजात बाळांसाठी विशेष उपाययोजना करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे.

नाशिक जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने (Nashik New Born baby Corona)  वाढतो आहे. तर दुसरीकडे या संकटात आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. नाशिकमध्ये दोन नवजात बाळांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत सर्वच वयोगटातील लोकांना कोरोनाची लागण होत असली तरी नवजात बाळांनाही कोरोनाने ग्रासलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 693 पर्यंत पोहोचला आहे. यात निफाडच्या विंचूर या ठिकाणच्या दोन दिवसांच्या बाळाला कोरोना झाला आहे. तर मालेगावमधील चंदनापुरीतील 10 दिवसांच्या चिमुरडीला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षण नव्हती. तर जवळपास 33 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका वयोवृद्ध लोकांना आणि लहान बाळांना जास्त आहे असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.  सांगत आहे. या धोक्यापासून विशेष करुन लहान मुलांचा बचाव कसा करावा हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना आता नवजात बाळांना देखील याचा धोका वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासोबतच पालकांची देखील चिंता वाढली आहे. मात्र याबाबत गरोदर महिलांनी किंवा प्रसूती झालेल्या मातांनी विशेष काळजी घेणे गरजेचे (Nashik New Born baby Corona) आहे.

संबंधित बातम्या : 

बेस्टच्या 81 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 70 टक्के कर्मचारी विलगीकरणात

कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीतील कोरोनाबाधितांचा आकडा 52 वर

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.