ड्रग्ज प्रकरणी व्हॉट्सअ‍ॅप चॅट उघड, बॉलिवूडच्या चार बड्या अभिनेत्रींना NCB समन्स बजावणार

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करताना ड्रग्जचा अँगल समोर आला (NCB investigate bollywood actress).

ड्रग्ज प्रकरणी व्हॉट्सअ‍ॅप चॅट उघड, बॉलिवूडच्या चार बड्या अभिनेत्रींना NCB समन्स बजावणार
Follow us
| Updated on: Sep 21, 2020 | 11:16 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करताना ड्रग्जचा अँगल समोर आला (NCB investigate bollywood actress). त्यामुळे आता तपासाची चक्र पूर्णपणे फिरली. ड्रग्ज प्रकरणात बड्या अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत आणि लवकरच आता बॉलिवूडमधील चार अभिनेत्रींना NCB कडून समन्स बजावलं जाणार आहे (NCB investigate bollywood actress).

या चार अभिनेत्रींमध्ये अभिनेता सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, श्रद्धा कपूर आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे याआधी रिया चक्रवर्तीनं सारा, रकुल आणि सिमॉनची नावं घेतल्याचं समोर आलं होतं. मात्र आता या यादीत श्रद्धा कपूरचंही नाव आल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे आज (21 सप्टेंबर) सुशांतची माजी मॅनेजर श्रृती आणि जया शहा यांची चौकशी करण्यात आली आहे. आता सारा, रकुल, सिमॉन आणि श्रद्धा कपूरची चौकशी करण्यासाठी NCB समन्स बजावण्याच्या तयारीत आहे. हे समन्स बजवण्याचं आणखी एक कारण म्हणजे NCB च्या हाती लागलेल्या चॅटिंग आहे. ज्यामध्ये जया शहा, N नावाच्या अभिनेत्रीशी चॅटिंग करत आहे. मात्र ही N नावाची अभिनेत्री कोण आहे ?, याबद्दल NCB नं खुलासा केलेला नाही.

N- नावाची अभिनेत्री चॅटिंगवर जया शहाला म्हणतेय की, “तू मला प्रॉमिस केलं होतं की मला चांगलं एमडी ड्रग्ज मुंबईत देणार आणि आपण सोबत पार्टी करणार ?, मी पुन्हा येईल तेव्हा मला खरंच एका ब्रेकची गरज आहे”. यावर जया साहनं उत्तर दिलं, “कसं काय ?, तू तर मला ड्रग्ज पेडलर बनवत आहे. पण ठिक आहे, तुझी इच्छा माझ्यासाठी आदेश आहे”.

या व्यतिरिक्त आणखी एक चॅटिंगही NCB च्या हाती आलं आहे. ज्यामध्ये जया साह बोलतेय, “की जेव्हा तू खाली येणार मला कॉल कर. मी खाली येणार आणि तुला देईल”.

हॅलो. मी आज CBD ऑईल जिंदलसोबत पाठवतेय. त्यानंतर श्रद्धा नावाची तरुणी उत्तर देते, हे, धन्यवाद.

या चॅटिंगमधील श्रद्धाचं पुढचं नाव काय आहे, हे समजू शकलेलं नाही. तसेच N नावानं नंबर सेव्ह असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवरुन ड्रग्ज मागणारी अभिनेत्री किंवा तरुणी कोण आहे याची माहिती घेण्याचं काम टीव्ही 9 ची टीम करतेय. मात्र बॉलिवूडमध्ये ड्रग्ज रॅकेट किती खोलवर गेलं. हेही आता हळूहळू समोर येतं आहे. कारण सध्या तर सारा, रकुल, सिमॉन आणि श्रद्धा कपूरला समन्स बजावलं जाईल. मात्र अजूनही रियानं घेतलेली 21 नावं समोर यायची आहेत.

संबंधित बातम्या :

karan Johar Party Video : आता करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, ‘शिरोमणी’च्या आमदाराची NCB कडे तक्रार

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : एकीकडे जामीनाची गडबड, दुसरीकडे आरोपींची धरपकड, NCB च्या गळाला बडा मासा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.