AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drugs Connection | करिश्मा प्रकाशची सहा तास झाडाझडती; गुरुवारी पुन्हा चौकशी होणार

अभिनेत्री दीपिका पदूकोण हिची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिची आज एनसीबीकडून सहा तास चौकशी करण्यात आली. ड्रग्जप्रकरणात सुरू असलेली ही चौकशी आज पूर्ण होऊ न शकल्याने उद्या गुरुवारी तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

Drugs Connection | करिश्मा प्रकाशची सहा तास झाडाझडती; गुरुवारी पुन्हा चौकशी होणार
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 8:23 PM

मुंबई: अभिनेत्री दीपिका पदूकोण हिची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिची आज एनसीबीकडून सहा तास चौकशी करण्यात आली. ड्रग्जप्रकरणात सुरू असलेली ही चौकशी आज पूर्ण होऊ न शकल्याने उद्या गुरुवारी तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. (NCB questioning Deepika Padukone’s ex-manager Karishma Prakash)

ड्रग्ज प्रकरणी करिश्मा प्रकाशला एनसीबीने आज चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार ती चौकशीसाठी हजरही राहिली. तिच्यासोबत तिची वकीलही होती. मात्र, सहा तास चौकशी करूनही तिची चौकशी पूर्ण न झाल्याने उद्या तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे, अशी माहिती एनसीबीचे ज्वॉइंट डारेक्टर एम. ए. जैन यांनी सांगितलं.

करिश्मा प्रकाश दीपिका पादुकोणची मॅनेजर होती. ती क्वान कंपनीच्या वतीने दीपिकाचे काम सांभाळत होती. एनसीबीने अलीकडेच तिच्या घरावर छापा टाकून ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर ती पुन्हा एकदा एनसीबीच्या रडारवर आली. आजच्या चौकशीत जर करिश्माने दीपिकाचे नाव घेतले, तर कदाचित एनसीबीच्या तपासाची सुई पुन्हा एकदा दीपिकाकडे वळू शकते.

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोणची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सेशन कोर्टाने करिश्मा प्रकाशला शनिवारपर्यंत अटक करू नये, असा आदेश दिला होता. यावेळी न्यायालयाने करिश्मा प्रकाशला देखील एनसीबीच्या चौकशीला सहकार्य करण्याचे आदेश दिले होते.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात 27 ऑक्टोबर रोजी करिश्मा प्रकाश हिच्या घरावर धाड टाकली होती. या धाडीत त्यांना 1.7 ग्रॅम हशीष ड्रग्स आणि भारतात बंदी असलेल्या सीबीडी ऑइलच्या (CBD Oil) 2 बाटल्या सापडल्या होत्या. याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात करिश्माला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत 27 ऑक्टोबर रोजी समन्स देण्यात आले होते. तसेच 28 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र,करिश्मा चौकशीसाठी हजर राहिली नाही. उलट तिने 29 ऑक्टोबर रोजी मुंबई सेशन कोर्टात धाव घेतली. मुंबई सेशन कोर्टात 3 नोव्हेंबरला तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने शनिवारपर्यंत (7 नोव्हेंबर) करिश्माला अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. (NCB questioning Deepika Padukone’s ex-manager Karishma Prakash)

संबंधित बातम्या:

Drugs Connection | ‘फरार’ करिश्मा एनसीबीसमोर हजर, ड्रग्ज प्रकरणी चौकशीला सुरुवात!