Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची मुसंडी, इतरांच काय झालं वाचा सविस्तर…

नाशिक जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल हाती आला असून राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. जवळपास ४१ जागांवर राष्ट्रवादीने विजय खेचून आणला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची मुसंडी, इतरांच काय झालं वाचा सविस्तर...
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 7:31 PM

नाशिक : आज संपूर्ण राज्यात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळाली. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायत निवडणुकीचा (Grampanchyat Election) निकाल समोर आला आहे. त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसने बाजी मारत 41 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या (NCP) विजयाचाच डंका आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुका, दिंडोरी, कळवण तालुक्यातील आकडेवारी बघता यामध्ये राष्ट्रवादी 41, शिवसेना 13, भाजप 05, काँगेस 04, शिंदे गट 01, इतर 16, माकप 08 अशा एकूण 88 जागा आलेल्या आहेत. यानुसार राष्ट्रवादी नाशिक जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून त्या खालोखाल शिवसेनेने बाजी मारली आहे. याशिवाय स्वराज्य संघटनेने देखील पहिला विजय नाशिकमधून मिळवला आहे.

नाशिक जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकाल पहिला कल हाती आला असून राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. जवळपास 41 जागांवर राष्ट्रवादीने विजय खेचून आणला आहे.

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थपन झाल्यानंतर त्यांचीच हवा पाहायला मिळत होती. मात्र राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने मिळवलेला विजय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

नाशिक जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. रविवारी मतदान केंद्रावर मतदान झाले. त्यानंतर आज मतमोजणी सुरू होती.

जिल्ह्यातील नाशिक तालुका, दिंडोरी, कळवण तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली त्यात राष्ट्रवादी 41, शिवसेना 13, भाजप 05, काँगेस 04, शिंदे गट 01, इतर 16, माकप 08 अशा एकूण 88 जागांचा निकाल आला आहे.

राष्ट्रवादी नाशिक जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून त्या खालोखाल शिवसेनेने बाजी मारली आहे असून शिंदे गटाच्या ताब्यात एक ग्रामपंचायत आली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनं देखील विजय मिळवला असून संघटनेच्या महिला कार्यकर्त्या ग्रामपंचायतीवर निवडून आल्या आहेत.

स्वराज्य संघटनेला महाराष्ट्रातून पहिला विजय हा नाशिक मधील गणेश गावातून मिळाला आहे. येथील रूपाली ठमके यांनी सरपंच म्हणून विजय मिळवला आहे.

दरम्यान, नाशिक निवडणुकीत उल्लेखनीय बाब म्हणजे नऊ सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध तर सदस्य पदासाठी तब्बल 334 जागा बिनविरोधात निवडून आल्या आहेत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.