VIDEO : थरार ! पावसामुळे लाईट गेली, दुरुस्तीसाठी महावितरणाचे कर्मचारी विद्युत वाहिनीवर, वैतरणा नदीचा अचानक प्रवाह वाढला, आणि…

वैतरणा नदीच्या पात्रात विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महावितरणाचे कर्मचारी (लाईटमन) गेले होते. मात्र, अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हे कर्मचारी तिथेच अडकून पडले.

VIDEO : थरार ! पावसामुळे लाईट गेली, दुरुस्तीसाठी महावितरणाचे कर्मचारी विद्युत वाहिनीवर, वैतरणा नदीचा अचानक प्रवाह वाढला, आणि...
थरार ! मुसळधार पाऊस, लाईट गेली, दुरुस्तीसाठी महावितरणाचे कर्मचारी वैतरणा नदीत, पाण्याचा प्रवाह वाढला आणि.....
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 6:12 PM

हुसैन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर : राज्यात विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. त्याचबरोबर पावसामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. पालघरमध्ये देखील तशीच घटना घडली होती. विशेष म्हणजे वैतरणा नदीच्या पात्रात विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महावितरणाचे कर्मचारी (लाईटमन) गेले होते. मात्र, अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हे कर्मचारी तिथेच अडकून पडले होते. त्यांना नदीच्या काठावर येणं कठीण होऊण बसलं होतं. ते वैतरणा नदीपात्रातील विद्युत वाहिनीवर अडकले. पण अखेर दीड तासांनी एनडीआरएफच्या पथकाने त्यांना सुखरुप नदी पात्रातून बाहेर काढलं.

नेमकं काय घडलं?

पालघर जिल्ह्यात काल (24 जुलै) पावसामुळे विजेची एक लाईन तुटली होती. त्यामुळे तिच्या दुरुस्तीच्या कामासाठी दोन लाईनमन नदी पात्रात गेले. ते वैतरणा नदीवरील उच्च दाब विद्युत वाहिनीच्या दुरूस्तीचे काम करण्यासाठी गेले. यावेळी ते नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने विद्यूत वाहिनीवरच अडकले. अखेर संध्याकाळी त्यांना नदीपात्रातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं.

…आणि पाण्याचा प्रवाह अचानक वाढला

मधुकर सातवी आणि प्रदीप भुयाळ असं या दोन महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बंद असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी नदीत पूर असल्याने हे दोन्ही कर्मचारी विद्युत वाहिनीवरून नदी पार करणार होते. नदीतून आपल्यासोबत कंडक्टर घेऊन जात असताना पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना कंडक्टर पुढे घेऊन जाण्यास अशक्य होत होते. त्यामुळे त्यांना पुढे जाणे शक्य होत नव्हते.

एनडीआरएफच्या पथकाकडून कर्मचाऱ्यांची सुटका

वैतरणा नदीच दोन्ही काठाचे अंतर जास्त असल्याने हे दोन्ही कर्मचारी मध्यभागीच अडकले. नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने या दोन्ही कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पालघरमध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफच्या टीमला मदतीसाठी बोलवण्यात आलं. त्यानंतर या टीमच्या मदतीने दोन्ही कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली.

या घटनेचा थरार बघा :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.