FARMER PROTEST | शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, टीआरएस आणि ‘आप’चा पाठिंबा

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिली आहे. काँग्रेसबरोबरच टीआरएस आणि आम आदमी पक्षानंही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

FARMER PROTEST | शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला काँग्रेस, टीआरएस आणि 'आप'चा पाठिंबा
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 3:39 PM

नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. त्यावर काँग्रेसनं आज अधिकृतरित्या शेतकऱ्यांच्या भारत बंदला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिली आहे. काँग्रेसबरोबरच टीआरएस आणि आम आदमी पक्षानंही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. (Congress, TRS, AAP support to the farmers’ movement)

“8 डिसेंबरला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचं समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनात राहुल गांधींनी टाकलेलं हे मजबूत पाऊल असेल. शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करु,” असं पवन खेडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

बैठकांमधून तोडगा नाहीच!

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 11वा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडूनही प्रयत्न सुरु आहेत. पण केंद्राने केलेले तिनही कृषी कायदे रद्द करावे, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे केंद्र सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्य़कर्तेही दिल्लीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर राज्यमंत्री बच्चू कडूही कार्यकर्त्यांसमेवर बाईकवरुन आंदोलनस्थळी पोहोचले आहेत.

शरद पवारही मैदानात

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत. शरद पवार हे सीताराम येचुरी आणि डी. राजा यांच्यासह राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना आमचा सरसकट विरोध नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मालाला किंमत 100 टक्के मिळाली पाहिजे. त्याबाबत बंधन असलं पाहिजे. नव्या कायद्यात सक्तीचा अभाव आहे. त्याबाबत उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर लोकमत समुहाने त्यांची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत पवार यांनी ही भूमिका मांडली आहे.

संबंधित बातम्या:

‘एनडीए’बाहेर पडलेल्या दोन पक्षांची भेट, अकाली दलाचे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला

BREAKING | शरद पवारांनी शड्डू ठोकला, थेट राष्ट्रपतींना भेटणार

तुमचे तीनच वर्षे उरलेत, ज्या तख्तावर तुम्ही बसलात, ते तख्त शेतकरी बदलून टाकतील : गुलाबराव पाटील

Congress, TRS, AAP support to the farmers’ movement

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.