बिहारचे मुख्यमंत्री होणार का?; नितीशकुमार म्हणतात…
नितीशकुमार गुरुवारी (12 नोव्हेंबर) पक्षाच्या नवनिर्वाचित आमदार आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जेडीयू कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली (Nitish Kumar on CM seat of Bihar).
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज पहिल्यांदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्व विचारला असता, “मी मुख्यमंत्रिपदाचा दावा केला नाही, याबाबत एनडीएमध्ये सहभागी असलेले पक्ष निर्णय घेतील. मुख्यमंत्रिपदासाठी माझ्याकडून कोणताही दबाव नाही”, असं उत्तर नितीशकुमार यांनी दिलं (Nitish Kumar on CM seat of Bihar).
नितीशकुमार गुरुवारी (12 नोव्हेंबर) पक्षाच्या नवनिर्वाचित आमदार आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जेडीयू कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली (Nitish Kumar on CM seat of Bihar).
“शपथविधी कार्यक्रमाचा तारीख अजून निश्चित झालेली नाही. शुक्रवारी (13 नोव्हेंबर) एनडीएनमध्ये सहभागी असलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल. या बैठकीत चर्चेतून सर्व गोष्टी ठरवल्या जातील. बिहारच्या जनतेने एनडीएला मत दिलंय. त्यामुळे आम्ही एनडीएच्याच बाजूने जाणार”, असं नितीश कुमार म्हणाले.
“आम्ही जनतेला सर्वश्रेष्ठ मानतो. जनता मालक आहे. जनतेने जो निर्णय घेतलाय तो आम्हाला मान्य आहे. एनडीएजवळ बहुमत आहे. त्यामुळे सरकार चालवण्यात काहीच अडचण येणार नाही. एनडीएच्या बैठकीत जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल”, असंदेखील नितीशकुमार म्हणाले.
I have made no claim, the decision will be taken by NDA: Nitish Kumar, Bihar CM and JD(U) Chief on being asked, “Who will be the CM?” pic.twitter.com/2U3XDIfRUF
— ANI (@ANI) November 12, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला 125 जागांवर विजय मिळाला आहे. यासह त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक 122 चा बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. त्यामुळे एनडीएचंच सरकार स्थापन होणार अशीच शक्यता आहे. मात्र, त्यात राजद-काँग्रेसच्या हालचालींनी राजकारण तापलं आहे. राजदच्या नेतृत्वातील महागठबंधनला 110 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. असं असलं तरी दोन्हींच्या मतांच्या टक्केवारीत फार कमी फरक आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महागठबंधनचं सरकार बनता बनता राहिल्याचं बोललं जातंय.
महागठबंधनला सरकार स्थापन करण्यात यश आलं नसलं तरी एकूण मतदानाच्या सर्वाधिक मतं मिळवण्यात त्यांना यश आलंय. महागठबंधनला 37.23 टक्के मतं मिळाली आहे, तर एनडीएला 37.26 टक्के मतं मिळाली आहेत. दोघांच्या मतांमध्ये केवळ 0.03 टक्क्यांचा फरक आहे.
संबंधित बातम्या :
बिहारच्या मुख्यमंत्रिपदापासून ’12’ पाऊलं दूर, तेजस्वी यादवांची पाटण्यात आमदारांसोबत बैठक
तेजस्वी यादवांचे एनडीएवर टीकास्त्र, महाआघाडी ‘धन्यवाद यात्रा’ काढणार