AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेल्मेटशिवाय प्रवेश नाही, नाशिकमध्ये आजपासून अंमलबजावणी; अन्यथा कार्यालय प्रमुखावर कारवाई

नाशिकमधील कुठलेही कार्यालय असो आणि येणारा कोणीही दुचाकीधारक. त्यांनी हेल्मेट घातलेले असेल तरच त्यांना त्या कार्यालयात प्रवेश मिळणार आहे.

हेल्मेटशिवाय प्रवेश नाही, नाशिकमध्ये आजपासून अंमलबजावणी; अन्यथा कार्यालय प्रमुखावर कारवाई
नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, पोलिसच या मोहिमेला हरताळ फासत आहेत.
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 11:47 AM

नाशिकः नाशिकमधील कुठलेही कार्यालय असो आणि येणारा कोणीही दुचाकीधारक. त्यांनी हेल्मेट घातलेले असेल तरच त्यांना त्या कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. या मोहिमेला आजपासून नाशिकमध्ये सुरुवात झाली. त्यामुळे हेल्मेट घालून न येणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी घरचा रस्ता दाखवला.

नाशिकमध्ये ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल मोहीम सुरू केली. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांचे समुपदेशन सुरू केले. त्यानुसार दुचाकीस्वारांना लगेच दंडाची पावती नाही, तर दोन तासांच्या समुपदेशनाचा डोस दिला. या उपदेशानंतर संबंधितांस एक प्रमाण पत्र देऊन सोडण्यात आले. आता या मोहिमेनंतर पुन्हा एकदा पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आता आणखी एक नवी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार नाशिक शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये आता विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही. तसे आदेशच त्यांनी काढले आहेत. आठ नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हेल्मेट न घालता आलेल्या अनेक दुचाकीस्वारांना शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात प्रवेश देण्यात आला नाही. महत्त्वाच्या शासकीय कार्यालयासमोर त्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सर्वात अगोदर पोलीस आयुक्तांनी आपल्या कार्यालयात या नियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

अन्यथा प्रमुख अधिकाऱ्यावर कारवाई

दुचाकीचालकाने हेल्मेट घातले नाही आणि अशा व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिल्यास तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 (ब) (1) नुसार बाराशे रुपयांचा दंड किंवा आठ दिवसांचा तुरुंगावास भोगावा लागेल. अथवा गरज पडल्यास दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगाव्या लागतील, असे पोलीस आयुक्तांनी 21 ऑक्टोबर रोजी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. विशेष म्हणजे सर्व आस्थापना प्रमुखांना वाहनतळ आणि प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे. पोलिसांचे भरारी पथक वेळोवेळी या भागात पाहणी करणार आहे. (No access to government, semi government office without a helmet, implementation from today in Nashik)

इतर बातम्याः

घरोघरी लसीकरणाला आजपासून नाशिकमध्ये सुरुवात; महानगरासह जिल्ह्यात राबवणार मोहीम, 474 केंद्रांची सोय

एसटी आंदोलनाला वाढते बळः नाशिकसह येवला, मनमाड, मालेगाव, नांदगावमधील कर्मचारी संपावर

कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं.