Article 370 हटवल्यानंतर मोदींचा जुना फोटो व्हायरल

कलम 370 हटवा बॅनरसोबतचा पंतप्रधान मोदी यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वेगवेगळ्या कॅप्शनसोबत हा फोटो शेअर केला जात आहे.

Article 370 हटवल्यानंतर मोदींचा जुना फोटो व्हायरल
Follow us
| Updated on: Aug 05, 2019 | 5:56 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेत संविधानातील ‘कलम 370’ (Article 370) ला हद्दपार करण्याचा प्रस्ताव ठेवला. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याची शिफारस राज्यसभेत केली. या प्रस्तावानुसार, जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश असतील. तर लडाख हा दूसरा केंद्रशासित प्रदेश असेल.

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर राष्ट्रीय महासचिव आणि वरिष्ठ नेते राम माधव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा एक जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यामागे एक बॅनर लावलेलं आहे. या बॅनरवर “कलम 370 हटवा, दहशतवाद मिटवा, देश वाचवा”, अशी घोषणा लिहिलेली आहे. ‘वचन पूर्ण केलं’, असं कॅप्शन राम माधव यांनी या फोटोला दिलं.

‘हा एक ऐतिहासिक दिवस आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जीसह हजारों शहीदांच्या राज्याच्या संपूर्ण विलीनीकरणाच्या इच्छेचा मान ठेवण्यात आला. देशाची सात दशकं जुनी मागणी आज आपल्या डोळ्यांसमोर अखेर पूर्ण झाली. कधी विचार केला होता, असं काही होईल?’, असंही राम माधव यांनी लिहिलं.

कलम 370 हटवा बॅनरसोबतचा पंतप्रधान मोदी यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वेगवेगळ्या कॅप्शनसोबत हा फोटो शेअर केला जात आहे.

हेही वाचा : कलम 370 काढण्याला कोणत्या पक्षाचा पाठिंबा आणि कुणाचा विरोध?

जम्मू -काश्मीरबाबतच्या 5 महत्वाच्या घडामोडी

1) कलम 370 हटवल्याने विशेष अधिकार संपुष्टात

2) जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित राज्यांची निर्मिती

3) भारतीय संविधानातील सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू

4) जम्मू काश्मीरची वेगळी घटना आणि झेंडा संपुष्टात

5) सर्वांना मालमत्ता खरेदी-विक्रीचा अधिकार

अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू काश्मीरबाबात दोन संकल्प आणि दोन विधेयकं सादर केली. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. यादरम्यान अमित शाहांनी जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचं विधेयक सादर केलं. यानुसार जम्मू काश्मीरमधून लडाख वेगळं केलं. लडाख हे विधानसभा नसलेलं, तर जम्मू काश्मीर विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश असेल.

हेही वाचा : Article 370 | राष्ट्रपतींचा तो आदेश, ज्याने कलम 370 हटवलं!

कलम 370 हटवलं तर काय होईल?

  • जम्मू काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा राहणार नाही.
  • एखादा नवा कायदा लागू करायला राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता नसेल.
  • त्यामुळे राज्याच्या कायद्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करु शकेल.
  • 370 कलम हटवल्याने संपत्ती खरेदीचा आणि गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल.
  • 370 कलमांतर्गत 35 A मुळे मिळालेले अधिकारही निघून जातील.
  • जम्मू काश्मीरमधील स्वतंत्र संविधान इतिहासजमा होईल, भारतीय राज्यघटना पाळावी लागेल
  • भारतीय संसद सर्वोच्च असेल
  • जम्मू काश्मीरमधील दुहेरी नागरिकत्व संपुष्टात
  • भारतीयांना काश्मीरमध्ये मालमत्ता विकत घेण्याचा आता अधिकार

VIDEO : 

 

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.