PHOTO | जळगाव, धुळ्यात काँग्रेसचा एल्गार, कृषी कायद्यांना कडाडून विरोध
काँग्रेसकडून कृषी कायद्यांविरोधात देशभारात आंदोलनं केली जात आहेत. महाराष्ट्रातही ट्रॅक्टर रॅल्यांद्वारे कृषी कायद्यांना विरोध केला जातोय.
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना काँग्रेसकडून कडाडून विरोध होत आहे.
Follow us
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना काँग्रेसकडून कडाडून विरोध होत आहे.
या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना किमान आधारभू किंमत (एमएसपी) मिळणार नाही; असा दावा काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसकडून कृषी कायद्यांविरोधात देशभरात आंदोलनं केली जात आहेत. महाराष्ट्रातही ट्रॅक्टर रॅलींद्वारे कृषी कायद्यांना विरोध केला जातोय.
यावेळी आज (9 नोव्हेंबर) जळगाव आणि धुळे जिल्ह्यात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुळ्यात आदिवासी विकासंत्री के.सी. पाडवी, आणि काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील उपस्थित होते.
तसेच जळगावमध्येही ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. यावेळीदेखील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव येथे आयोजित केलेल्या या ट्रॅक्टर रॅलीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जळगाव जिल्ह्याचे निरीक्षक प्रकाश मुगदिया, काँग्रेसचे जिल्हभरातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.