PHOTO : आवडत्या श्वानांसह राज ठाकरे शिवाजी पार्कवर, लहानग्यांसोबतही वेळ घालवला
Follow us
राज ठाकरे यांचं श्वानप्रेम सर्वांनांच माहित आहे. अनेकदा त्यांचं हे श्वानांवरील प्रेम सार्वजनिपणे पाहायलाही मिळालं आहे.
पुन्हा एकदा आज (15 जानेवारी) राज ठाकरेंचं श्वान प्रेम दिसून आलं. ते शिवाजी पार्क (दादर) येथे श्वानांसोबत वेळ घालवताना दिसले.
यावेळी राज ठाकरे यांनी मैदानावरील लहान मुलांसोबतही काही वेळ घालवला. बच्चे कंपनीने देखील राज ठाकरे यांच्यासोबत छान वेळ घालवत या क्षणांचा मनमुराद आनंद लुटला.
राज ठाकरे यांना शिवाजी पार्कवर पाहिल्यानंतर तेथील नागरिकांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली.
राज ठाकरे यांनी काही वेळ शांतपणे बसून विरंगूळाही केला. त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी देखील होते.