पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा
कोरोना लसीकरणाची तयारी आणि आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवली आहे. (PM Narendra Modi held Meeting with All Chief Minister)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. येत्या सोमवारी (11 जानेवारी) संध्याकाळी 4 वाजता मोदींची मुख्यमंत्र्यांसोबतची ही बैठक होईल. कोरोना लसीकरणाची तयारी आणि त्याबाबतचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवली आहे. (PM Narendra Modi held Meeting with All Chief Minister)
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. लवकरच कोरोनाची ही लस सर्वसामान्यांना दिली जाईल. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वर्षभराच्या आतच भारताना कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. कोरोनाची ही लस सर्वात आधी डॉक्टर, नर्स यासारखे आरोग्य कर्मचारी, सैनिक यासारख्या कोरोना योद्धांना दिली जाणार आहे.
यानंतरच्या टप्प्यात कोरोना लस ही 50 हून अधिक वय असलेल्या किंवा 50 हून कमी वय आजारी असलेल्या व्यक्तींना दिली जाईल. संपूर्ण देशात येत्या दहा दिवसात कधीही कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु होईल, अशीही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
आम्ही कोरोना लसीकरणासाठी तयार आहोत. मात्र लसीकरणाची अंतिम तारीख सरकारकडून निश्चित करण्यात येईल. डीसीजीआयने 2 आणि 3 जानेवारीला लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली होती. त्यानंतर म्हणजेच 13 जानेवारीपूर्वी कोरोना लसीकरणाला सुरुवात केली जाऊ शकते, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली होती.
लसीकरणासाठी तीन कोटी कोरोना योद्धांना प्राधान्य
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आरोग्य विभागातील कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केले. सैन्य दल आणि पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांना कोवीन अॅपवर नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. सामान्य व्यक्तींना कोरोना लसीसाठी नोंदणी करावी लागेल.
लस प्रत्येक बूथवर पोहोचण्यासाठीची सिस्टम तयार
राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लस ही प्रत्येक बूथवर पोहोचण्यासाठी पूर्ण सिस्टम तयार करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक राज्याने यासाठी युनिट तयार केले आहे. यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाऊ शकतो.
देशात चार ठिकाणी लसीचा साठा
मुंबई, कर्नाल, चेन्नई आणि कोलकातामध्ये या चार प्रमुख ठिकाणांवर कोरोना लसीकरणाचा साठा केला जाणार आहे. त्यानंतर 37 पुढील टप्प्यात लसीकरण ठिकाणांवर लस साठवली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली. लसीच्या वाहतुकीसाठी विमानसेवेचा वापर केला जाणार आहे. (PM Narendra Modi held Meeting with All State Chief Minister)
संबंधित बातम्या :
Corona Vaccine | काऊंटडाऊन सुरु, देशभरात कोरोना लसीकरणाची तारीख ठरली
Corona Vaccine | लस श्रीमंतांना परवडेल, पण गरिबांचं काय? राजेश टोपेंचा सवाल