संचारबंदीत जुगाराचा डाव, नागपुरात ‘डॉक्टर’ नगरसेवकाला अटक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात रात्री 9 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली (Police action on gambling Nagpur) आहे.

संचारबंदीत जुगाराचा डाव, नागपुरात 'डॉक्टर' नगरसेवकाला अटक
Follow us
| Updated on: Jun 17, 2020 | 6:12 PM

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात रात्री 9 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली (Police action on gambling Nagpur) आहे. मात्र या संचारबंदीतही नागपुरातील आनंद नगर परिसरात जुगाराचा डाव भरला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी काल (16 जून) जुगाराचा डाव सुरु असलेल्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी तेथे हजर असणाऱ्या सर्वांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये डॉक्टर आणि नगरसेवकाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागपुरात याची चांगलीच चर्चा रंगली (Police action on gambling Nagpur) आहे. पोलिसांना या कारवाईत एकूण 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कोरोना विरोधातल्या लढ्यात डॉक्टर, आरोग्य सेवेचे कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांची भूमिका महत्वाची आहे. मात्र, नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने जेव्हा अत्रे लेआऊट परिसरातील आनंद नगर या उच्चभ्रू कॉलनीमध्ये धाड टाकली. तेव्हा एका बंगल्यात नागपूरचे एक नगरसेवक, शासकीय रुग्णालयातील एक वरिष्ठ डॉक्टर यांच्यासह आरोग्य सेवेतील कर्मचारी जुगार खेळताना आढळले. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात समाजाला ज्या वर्गाकडून मोठी अपेक्षा आहे. त्यापैकीच काहीजण नियमबाह्य कामे करत कायदा पायदळी तुडवत असल्याचे उघड झाले.

नागपूर पोलिसांना काल रात्री आनंदनगर भागात एका बंगल्यात अनेक लोकं जमा होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने आनंदनगर भागात त्या बंगल्यावर धाड टाकली. तेव्हा त्या ठिकाणी अनेक लोकं जुगार खेळताना आढळले. सुरुवातीला या सर्वानी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात अपयशी ठरल्यानंतर जुगार खेळणाऱ्या या बड्या मंडळीने पोलिसांवर दबाव आणत जुगाराची कारवाई करू नये असे प्रयत्न केले. मात्र कोणत्याही दबावात न येता पोलिसांनी त्यांची कारवाई पूर्ण केली.

पोलिसांनी त्या ठिकाणातून हजारो रुपयांची रोकड, दहा मोबाईल, तीन कार, दोन बाईक्स याच्यासह एकूण 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या नगरसेवकासह सरकारी डॉक्टर, आरोग्य सेवेतील कर्मचारी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या : 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट थेट बीएमसीकडे का? मनसेचा सवाल, रुग्णाला रिपोर्ट कळवण्याची मागणी

Nagpur Corona | नागपूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग, 13 पैकी 8 तालुक्यात शिरकाव

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.