Marathi News Latest news Police commemoration day 2020 cm uddhav thackeray amit shah expressed his gratitude to the police personnel and their families
संपूर्ण देशभरात हा दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी शहीद पोलिसांनी श्रद्धांजली वाहिली जाते.
(Police Commemoration Day 2020)
Follow us
भारतीय सैन्यातील जवानांप्रमाणेच कर्तव्य बजावताना देशातील पोलिसांनी केलेल्या बलिदानाचं स्मरण करणारा दिवस म्हणजे 21 ऑक्टोबर.
संपूर्ण देशभरात हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली जाते.
या निमित्ताने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारकात शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.
तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील नायगाव येथे पोलीस स्मृतिदिन समारंभ पार पडला.
यावेळी देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानिमित्ताने पोलिस स्मृतिदिन संचलन समारंभ देखील पार पडला. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध पोलिस दलांमधील 26 पोलीस अधिकारी आणि 240 पोलीस अंमलदारांना आपले कर्तव्य बजावतांना वीरगती प्राप्त झाल्याबद्धल श्रद्धांजली वाहिली आणि या वीरश्रेष्ठांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणाऱ्या या महान हुतात्म्यांना मी नमन करतो. मातृभूमीबद्दलची त्यांची ही बांधिलकी प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते, असे मत अमित शाह यांनी व्यक्त केले.
आपल्या पोलीस कर्मचार्यांच्या विशिष्ट सेवा आणि त्यांच्या अतुलनीय धैर्याबद्दल मला अभिमान आहे, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.