रामदास आठवलेंच्या ताफ्यातील पोलिसाला कोरोनाची लागण, राज्यभरात 64 पोलिसांना कोरोना

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Police infected corona positive) यांच्या ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रामदास आठवलेंच्या ताफ्यातील पोलिसाला कोरोनाची लागण, राज्यभरात 64 पोलिसांना कोरोना
Follow us
| Updated on: Apr 22, 2020 | 6:18 PM

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Police infected corona) यांच्या ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामदास आठवले यांच्या मुंबईच्या वांद्रे येथील ‘संविधान’ या निवासस्थानी सुरक्षेसाठी हा पोलीस कर्मचारी तैनात होता. हा कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून गावी गेला होता. या पोलीस कर्मचाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्याच्यावर नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या रुग्णासह राज्यात एकूण 64 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे (Police infected corona).

रामदास आठवले यांच्या निवासस्थानी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती. ते काही दिवसांपूर्वी गावाला गेले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांची रक्त तपासणी करण्यात आली होती. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासन घेत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. याच दरम्यान कोरोनाचा शिरकाव आता महाराष्ट्रातील पोलीस विभागातही झाला आहे.

राज्यात 23 मार्चपासून ते आतापर्यंत एकूण 64 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 11 पोलीस अधिकारी आहेत. तर 53 पोलीस शिपाई आहेत. या सर्वांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे आज दिवसभरात तब्बल 15 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, रामदार आठवले यांच्याअगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या महिला अधिकाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या मुख्यमंत्री या बंगल्यात वास्तव्यास नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वांद्र्यातील ‘मातोश्री’ या निवासस्थानी राहतात. काही दिवसापूर्वी ‘मातोश्री’ बंगल्याजवळचा एक चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

‘वर्षा’वरील संबंधित महिला पोलीस अधिकारी झोन टूमधील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी त्यांची ड्युटी वर्षा बंगल्यावर लागली होती. त्यांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर, त्यांच्या संपर्कातील इतरांना क्वारंटाईन करण्यात आलं.

संबंधित बातम्या :

पिंपरी चिंचवडमध्ये तरुणांना कोरोनाचा विळखा, एकूण 64 रुग्णांपैकी तरुण रुग्णांची संख्या…

डॉक्टरांवर हल्ला केल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास, जामीनही नाही, मोदी सरकारचा मोठा निर्णय

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.