Poonam Pandey | गोव्याच्या किनारी आक्षेपार्ह व्हिडीओ, मॉडेल पूनम पांडे पोलिसांच्या ताब्यात

गोव्यातील धरणावर आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याने अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेला गोवा पोलिसांनी अटक केली आहे.

Poonam Pandey | गोव्याच्या किनारी आक्षेपार्ह व्हिडीओ, मॉडेल पूनम पांडे पोलिसांच्या ताब्यात
Poonam Pandey
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 4:02 PM

मुंबई : गोव्यातील धरणावर आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याने अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. थोड्याच वेळात तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. व्हिडीओच्या चित्रिकरणादरम्यान पूनम पांडेजवळ (Poonam Pandey Arrest) उभ्या असलेल्या दोन पोलिस कर्मचार्‍यांनाही निलंबित करण्यात आले आहे. कॅनकोना पोलिसांनी पूनमला अगौदा येथील रिसॉर्टमधून अटक केली आहे. या प्रकरणात अश्लील फोटो शूट करणार्‍या अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल आहे (Poonam Pandey Arrested by goa police for shooting an obscene video).

गोव्यातील चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओचे चित्रीकरण केल्याने पूनम पांडे विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला शाखेने पूनम पांडे विरोधात गोव्यातील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या एफआयआरमुळे पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

लग्नानंतर गोव्यावरून परतलेली पूनम नुकतीच पुन्हा गोव्यात परतली होती. पूनम पांडेचा सदर व्हिडीओ चित्रित करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दक्षिण गोव्याचे एसपी पंकज कुमार सिंह यांनी एएनआयला माहिती देताना सांगितले की, जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आयपीसीच्या कलम 294 अन्वये पूनम पांडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Poonam Pandey | पूनम पांडे पुन्हा एकदा वादात, गोव्यात एफआयआर दाखल!

लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात पतीकडून मारहाण

बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत 11 सप्टेंबरला पूनमने लगीनगाठ बांधली होती. फारसा गाजावाजा न करता पूनम गुपचूप लग्नाच्या बोहल्यावर चढली. पूनम आणि सॅम या दोघांनी लग्न समारंभातील फोटो आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. लग्नानंतर अवघ्या 13 दिवसानंतर पूनम पांडेने तिचा नवरा सॅम बॉम्बे याच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. हनिमूनसाठी गोव्याला गेलेल्या या जोडीमध्ये जोरदार भांडणे सुरू झाली होती. या दरम्यान पूनम पांडेने पती सॅमविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. तसेच, तिने हे नाते तोडत, घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले होते. (Poonam Pandey Arrested by goa police for shooting an obscene video)

सॅम बॉम्बेने पूनमला इतकी मारहाण केली होती की तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पूनमच्या तक्रारीवरून सॅमला अटक करण्यात आली होती. यानंतर काहीवेळाने त्याला जामीन देखील मिळाला होता.

पतीने आपला विनयभंग केल्याचा आरोप करत पूनम पांडेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची धमकी पतीने दिल्याचा दावाही तिने केला होता. वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर गोवा कोर्टाने सॅम बॉम्बे याची सुटका केली होती. दक्षिण गोव्यातील कॅनाकोना गावात पूनम पांडे शूटिंग करत असलेल्या चित्रपटाच्या ठिकाणी हा प्रकार घडला होता.

(Poonam Pandey Arrested by goa police for shooting an obscene video)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.