Pramvir singh letter : शरद पवारांकडे तक्रार करुनही देशमुखांवर कुठलीच कारवाई नाही? परमबीरसिंहांच्या पत्रात थेट बोट

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केलाय. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केलाय.

Pramvir singh letter : शरद पवारांकडे तक्रार करुनही देशमुखांवर कुठलीच कारवाई नाही? परमबीरसिंहांच्या पत्रात थेट बोट
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 7:20 PM

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी झालेल्या परमबीर सिंग यांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारा लेटरबॉम्ब टाकला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केलाय. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केलाय. दरम्यान, परमबीर सिंग यांच्या कारनाम्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याचं पवार यांनी पत्रात म्हटलंय.(Former Mumbai CP Parambir Singh’s letter to CM Uddhav Thackeray, serious allegations against Anil Deshmukh)

शरद पवारांकडून कुठलिही कारवाई नाही!

“मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातलं. एवढच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथं उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असं माझ्या लक्षात आलं”, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केलाय. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे तक्रार करुनही त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही, असं सांगत परमबीर सिंग यांनी थेट पवारांकडेच बोट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांना आवाहन

भारताचा खरा नागरिक म्हणून मी मागील 32 वर्षे पोलीस अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेला जागलो आहे. मी खाली नमूद केलेल्या मुद्द्यांची आपण दखल घ्यावी ही विनंती. तसेच तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाच्या संवैधानिक जबाबदाऱ्यांच्या पाठिशी उभे राहा, असं आवाहन परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. या सिंग यांच्या 23 मुद्द्यांच्या या पत्रात पहिला मुद्दा हाच आहे.

प्रत्येक महिन्याला 100 कोटींचं टार्गेट!

परमबीर सिंग यांच्या पत्रात अजून एक अतिशय गंभीर मुद्दा आहे. “सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकिय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सुचना केली. त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहीलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा करता येईल”, असं सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

संबंधित बातम्या :

अनिल देशमुखांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट, परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Sachin Vaze Case : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादावर पुस्तक लिहिण्यासाठी सगळा कट?

Former Mumbai CP Parambir Singh’s letter to CM Uddhav Thackeray, serious allegations against Anil Deshmukh

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.