IAS Success Story: गावातील लोकांनी केला विरोध, तरी शेतकऱ्याची लेक इंजिनियरिंग केल्यानंतर IAS बनली
तुमच्याकडे जिद्द असेल तर तु्म्ही कोणतेही अवघड काम करु शकता, त्यासाठी तुम्हाला केवळ स्वत:च्यावर विश्वास असावा लागतो. या जिद्दीने एका छोट्या गावातून आयएएस होण्याच्या जिद्दीने निघालेल्या लेकीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.
लहानपणी खेळण्या बागडण्याच्या दिवसात प्रिया राणी यांना आपल्या स्वप्नांसाठी गावातील लोकांशी लढावे लागले. बिहारमध्ये राहणाऱ्या प्रिया राणी यांना गावातील लोकांचा विरोध सहन करावा लागला. ती अभ्यासात प्रचंड हुशार होती. परंतू तिच्या गावातील लोक जुन्या विचारांचे होते. तिला अभ्यासापासून दूर रहाण्यासाठी सांगत होते. परंतू तिला तिच्या आजोबांनी साथ दिली आणि अखेर प्रिया राणी हीने त्यांचे आयएएस अधिकारी बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण केलेच…
प्रिया राणी बिहारच्या फुलवारी शरीफ येथील कुरकुरी गावाची रहिवासी आहेत. त्यांचे वडील अभयकुमार शेतकरी आहे. प्रिया हिच्या गावातील लोक तिच्या शिक्षणाला विरोध करत होते. परंतू प्रिया राणी हिच्या स्वप्नांना तिच्या आजोबांनी ओळखले आणि पाठींबा दिला.प्रिया राणी आज लाखो तरुणांचे प्रेरणा स्थान आहे. जे जीवनात संघर्ष करीत आहेत. त्यांच्यासाठी प्रिया ही एक प्रेरणा स्थान आहे. कोणतीही शक्ती तुमच्या मेहनत आणि इच्छे पुढे टिकू शकत नाही हे प्रिया यांनी सिद्ध केले.
प्रिया राणी यांना गावात राहून अभ्यास करता येणे कठीण होते. मग त्यांचे वडील आणि आजोबा सुरेंद्र प्रसाद शर्मा यांनी तिला पाटणा येथे पाठवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण डॉन बॉस्को शाळेत झाले. तसेच सेंट मायकल स्कूलमध्ये १२ वी पर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर २०१८ मध्ये बीआयटी मेसरा येथून त्यांना इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीटेक केले. प्रिया राणी यांनी युपीएससी परीक्षा चारवेळा दिली. त्यापैकी दोनदा त्यांना यश आले. २०२३ रोजी चौथ्या प्रयत्नात त्यांना ६९ वी रँक मिळाला. त्यानंतर त्याअखेर आयएएस अधिकारी बनल्या आहेत.
नागरी सेवेसाठी मोठ्या पगाराची नोकरी सोडली
बीटेक डिग्री मिळाल्यानंतर प्रिया राणी हीला बंगळुरु येथील कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. परंतू तिला सिव्हीस सर्व्हीसमध्ये जायचे होते. त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. आणि युपीएससीचा अभ्यास सुरु केला. त्यांच्या या निर्णयाने पालक खुश नव्हते. परंतू त्यांच्या मेहनतीला यश आले. २०२१ मध्ये युपीएससी सिव्हील सर्व्हीस परीक्षा दुसऱ्या प्रयत्नात २८४ वा रँक मिळाला. त्यावेळी त्यांची निवड इंडियन डिफेन्स सर्व्हीससाठी झाली.
आयएएस अधिकारी बनण्यासाठी डबल मेहनत
सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही त्या अस्वस्थ होत्या. त्यांना आयएएस बनायचे होते. वडीलांच्या पाठींब्याने आणि प्रेरणेमुळे त्या चौथ्या प्रयत्नात युपीएससी पास झाल्या. आयएएस प्रिया राणी आपल्या यशाचे श्रेय शिस्त आणि कठोर मेहनतीला दिले. आयएएस अधिकारी बनण्यासाठी रोज सकाळी ४ वाजता उठून अभ्यास करायच्या. त्यांनी इकॉनॉमिक्स विषयावर खास फोकस केला. प्रिया यांनी NCERT च्या पुस्तकातून आणि वृत्तपत्रे वाचून युपीएससीची तयारी केली होती.