दिल्लीत शरीरविक्री करणाऱ्या महिलांना नवी दिशा, कोरोना मास्क निर्मितीचे काम हाती

कोरोनामुळे दिल्लीतील जीबी रोडवरील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट आले (Prostitutes are making mask) आहे.

दिल्लीत शरीरविक्री करणाऱ्या महिलांना नवी दिशा, कोरोना मास्क निर्मितीचे काम हाती
Follow us
| Updated on: Jun 28, 2020 | 2:31 PM

नवी दिल्ली : कोरोनामुळे दिल्लीतील जीबी रोडवरील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट आले (Prostitutes are making mask) आहे. अशामध्ये काही महिला आपल्या घरी परतल्या आहेत. तर काही महिला मास्क तयार करण्याचे काम करुन आपला उदरनिर्वाह करत आहेत. वैश्या व्यवसाय करणाऱ्या यातून बाहेर पडून मास्क तयार करण्याचे काम करत असल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. एका एनजीओसोबत मिळून त्या मास्क तयार करण्याचे काम करत (Prostitutes are making mask) आहे.

भारतातील सर्वात प्रसिद्ध वैश्या व्यवसायाचे ठिकाण म्हणून दिल्लीच्या जीबी रोडचे नाव घेतेल जाते. हा रोड अजमेरी गेटपासून लाहौरी गेटपर्यंत पसरले आहे. एक किलोमीटर एवढा हा विभाग आहे. या रोडवरील इमारती आणि दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात सेक्स वर्कर राहतात. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महामारी दरम्यान, येथे येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. काही सेक्स वर्कर्स अशा आहेत ज्यांना काम नसल्याने त्या घरी परतल्या आहेत. तर काही अशा सेक्स वर्कर्स आहेत ज्या एनजीओमध्ये जाऊन मास्क तयार करण्याचे काम करत आहेत. सध्या जीबी रोड येथे 750 महिला उपस्थित आहेत.

“आमच्या एनजीओमध्ये जीबी रोडवरुन आठ महिला मास्क तयार करण्यासाठी येतात. आता आम्ही त्यांना मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण देत आहगे. जेणेकरुन भविष्यात त्या इतर महिलांनाही मास्क तयार करण्याचे शिकवू शकतील”, असं कटकथा एनजीओचे असोसिएट डायरेक्टर गीतांजली यांनी सांगितले.

“जीबी रोडच्या इतर महिलांना आम्ही विनंती केली की, त्यांनी त्यांच्या कोठ्यामध्येच मास्क तयार करण्याची प्रक्रिया सुरु करावी. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. पण आता यासाठी थोडा वेळ लागेल. सध्या 750 महिला जीबी रोडीमध्ये उपस्थित आहेत, असंही गीतांजली म्हणाल्या.

इमारतीत 84 कोठे

जीबी रोडवर 22 इमारती आहेत. यामध्ये सर्व इमारतीमध्ये एकूण 84 कोठे आहेत आणि प्रत्येक कोठ्याचा एक नंबर आहे. हे सर्व कोठे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आहेत. प्रत्येक कोठ्यात दहा ते पंधरा सेक्स वर्कर्स आहेत. एकूण 750 सेक्स वर्कर्स आहेत.

“लॉकडाऊनमुळे मास्क तयार करण्यास शिकत आहे. मी येथे रोज येते आणि मास्क कसा बनवतात ते शिकते”, असं वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने सांगितले.

“वेश्या व्यवसाय आमचे काम आहे. आम्ही हेच काम करतो आणि तेच आता बंद झाले आहे. आता आम्ही काय करणार? मला 3 मुले आहेत, त्यांचा खर्च कसा करणार? मी येथे 15 वर्षांपासून काम करत आहे. कोरोनाची खूप भीती वाटते. कुणीही ग्राहक आला तरी भीती वाटते”, असं एका दुसऱ्या वैश्या महिलेने सांगितले.

संबंधित बातम्या :

MNS | मास्क, पीपीई किटमध्ये भ्रष्टाचार, मनसेच्या आरोपांना परिवहनमंत्र्यांचं उत्तर

Paithani Mask | कोरोनापासून बचावासाठी मुंबईकरांची खास ‘पैठणी मास्क’ला पसंती

वाढदिवसाला पत्नीने दोन ड्रेस शिवायला दिले, उरलेल्या कपड्यातून टेलरने मास्क बनवले, गुलाबरावांच्या मॅचिंग मास्कचं रहस्य

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.