मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, 1 डिसेंबरला निदर्शनं तर 8 डिसेंबरला लाँग मार्च

एक आणि दोन डिसेंबरला महावितरण कार्यालयांसमोर राज्यभर निदर्शनं तर 8 डिसेंबरला मुंबईत वाहन मार्च काढण्यात येणार आहे. (maratha kranti morcha meeting)

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, 1 डिसेंबरला निदर्शनं तर 8 डिसेंबरला लाँग मार्च
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 7:58 PM

पुणे : मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न तसेच इतर मुद्द्यांवरुन मराठा क्रांती मोर्चा (maratha kranti morcha) पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. येत्या डिसेंबर महिन्यात मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहेत. 1 आणि 2 डिसेंबरला महावितरण कार्यालयांसमोर राज्यभर निदर्शनं तर 8 डिसेंबरला मुंबईत लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. रविवारी (29 नोव्हेंबर) पुणे य़ेथे मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आले. (protest of maratha kranti morcha in December month across the states)

रविवारी (29 नोव्हेंबर) पुण्यात मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच इतर समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी 1 आणि 2 डिसेंबरला राज्यातील महावितरण कार्यालयांसमोर निदर्शनं करण्यात येतील. तसेच, 8 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुंबईवर लाँग मार्च काढण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर निदर्शनं

‘राज्य सरकारने महावितरण विभागात मराठा उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येत्या 1 आणि 2 डिसेबंरला प्रत्येक जिल्ह्यातील अधिक्षक कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात करणार आहे. तसेच, येत्या 8 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील मराठा समाजाकडून मुंबई येथे लाँग मार्च काढण्यात येणार आहे,’ अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बैठक संपल्यानंतर दिली.

यावेळी, या बैठकीत मराठा समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली. 2014 ते 2020 या काळातील प्रलंबित शासकीय नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी, शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत सुपर न्युमररी पद्धतीने जागा, अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यान्वित करणे, असे अनेक प्रश्न जसेच्या तसे आहेत. हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. यामुळेच येत्या डिसेंबर महिन्या ही आंदोलनं आयोजित करण्यात आल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

यावेळी या बैठकीत दिल्ली येथून छत्रपती संभाजीराजे, ॲड. दिलीप तौर, औरंगाबाद येथून एम. एम. तांबे, अहमदनगर येथून बाळासाहेब सराटे यांनी संवाद साधला. तर, या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, तुषार काकडे, राजेंद्र कुंजीर, विरेंद्र पवार- मुंबई, संजीव भोर- अहमदनगर, अंकुश कदम- नवि मुंबई, विनोद साबळे- रायगड, राजन घाग- मुंबई, तुषार जगताप, गणेश कदम- नाशिक, दिलीप पाटील- कोल्हापूर, माऊली पवार, रवी मोहीते- सोलापूर, गंगाधर काळकुटे- बीड, रवी सोडतकर- औरंगाबाद, डॉ. संजय पाटील- सांगली, रूपेश मांजरेकर- मुंबई, किशोर मोरे‌, दशहरी चव्हाण तसेच अनेक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही; उदयनराजेंचा सवाल

उदयनराजेंना बोलायचं ते बोलू द्या, मराठा आरक्षणाबद्दल सरकार गंभीर, शिवसेनेचं उत्तर

फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्याला नावं ठेवली, सत्तेत आहात तर करुन दाखवा, उदयनराजे आक्रमक

(protest of maratha kranti morcha in December month across the states)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.