पुण्याच्या भवानी पेठेत पालिकेकडून विशेष कक्ष, नागरिकांकडून मात्र सहकार्य नाही
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, त्यांना विलगीकरण करून औषधोपचार सुरू करणे, अनुषंगिक कामे या पथकाकडून केली जाणार (Pune bhavani peth Special cell) आहेत.
पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत (Pune bhavani peth Special cell) आहे. पुण्यातील ‘भवानी पेठ’ कोरोनाचे ‘डेथ सेंटर’ ठरत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुण्यात दगावलेल्या 34 पैकी 11 कोरोनाबाधित भवानी पेठेतील रहिवासी होते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने भवानी पेठ परिसरात विशेष कक्ष सुरु करण्यात आलं आहे. मात्र अद्याप याला नागरिकांचे हवं त्याप्रमाणे सहकार्य मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या विशेष कक्षात क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त स्तरावर (Pune bhavani peth Special cell) सर्व आवश्यक कामे आणि उपाययोजना केल्या जाणार आहेत. पण अद्याप नागरिकांकडून याला हवं तसं सहकार्य मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालिकेने या भागात काम करण्याकरिता आणि अधिक कडक उपाययोजनांसाठी विशेष कक्ष निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कक्षामध्ये दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक इत्यादींचा समावेश असणार आहे. हे पथक क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार काम करणार आहे.
या भागात सखोल सर्वेक्षण करणे, अधिकाधिक स्क्रिनिंग करणे, लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करणे यांसह इतरही कामे केली जाणार आहेत.
तसेच आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, त्यांना विलगीकरण करून औषधोपचार सुरू करणे, अनुषंगिक कामे या पथकाकडून केली जाणार आहेत.
पुण्यातील कोणत्या वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक (12 एप्रिलपर्यंत) झाला आहे, याची माहिती महापालिकेने जारी केली आहे. भवानी पेठ परिसरात सातत्याने कोरोना रुग्ण आढळत असल्याने इथली रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. रविवारपर्यंत भवानी पेठेत 13 नवे रुग्ण आढळल्यामुळे इथल्या कोरोनाग्रास्तांची संख्या 78 वर पोहोचली (Pune bhavani peth Special cell) आहे.