Pune Rain Live Update | पुण्यात पावसाचा कहर, मृतांचा आकडा 13 वर

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवार 26 सप्टेंबर 2019 रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

Pune Rain Live Update | पुण्यात पावसाचा कहर, मृतांचा आकडा 13 वर
Follow us
| Updated on: Sep 26, 2019 | 5:41 PM

पुणे : पुण्यात काल (बुधवारी) रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने शहरात अक्षरशः धुमाकूळ (Pune City Heavy Rains) घातला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील बरेचसे रस्ते जलमय झाले असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. मुसळधार पावसामुळे गेलेल्या बळींचा आकडा 13 वर पोहचला आहे.

अरणेश्वर टांगेवाली कॉलनी परिसरात भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला, तर तीन ते चार जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 13 वर्षीय रोहित भरत आमले, 55 वर्षीय संतोष कदम, 32 वर्षीय सौंदलीकर (महिला) आणि त्यांचा 9 वर्षांचा मुलगा यांचा मृत्यू झाला. तर सिंहगड परिसरात कारमध्ये दत्तात्रय गिरमे यांचा मृतदेह आढळला.

LIVE UPDATE : 

[svt-event date=”26/09/2019,5:40PM” class=”svt-cd-green” ] 575 लोकांना वाचवलं, 3500 लोकांना खबरदारी म्हणून स्थलांतरित केलं, 61 जनावरांचा मृत्यू, पुणे आयुक्त सौरभ राव यांची माहिती [/svt-event]

[svt-event date=”26/09/2019,5:37PM” class=”svt-cd-green” ] साथीचे आजार पसरू नये याची दक्षता घेतली जात आहे, जीवितहानी होणार नाही याची काळजी घेतोय, आम्ही पूरपरिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतोय, ओढ्यांमध्ये अतिक्रमण असल्यामुळे ही परिस्थिती उदभवली : पुणे आयुक्त सौरभ राव [/svt-event]

[svt-event date=”26/09/2019,5:36PM” class=”svt-cd-green” ] देवदूतच्या गाड्या, अग्निशमन दलाच्या गाड्या रुग्णवाहिका पूरग्रस्त भागात रात्री तैनात करण्यात येतील : आयुक्त सौरभ राव [/svt-event]

[svt-event date=”26/09/2019,5:36PM” class=”svt-cd-green” ] लोकांच्या घरात 10 फुटापर्यंत पाणी शिरलं होतं, उद्यापासून लोकांना मदत पोहोचवणार, स्वयंसेवी संस्था वस्तू स्वरूपात मदत देण्यासाठी पुढे आल्या, पाण्यासोबत गाळ, फर्निचर वाहून आलं आहे, ते बाजूला घेतलं जातं आहे, पाण्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू, आजही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय : पुणे आयुक्त सौरभ राव [/svt-event]

[svt-event date=”26/09/2019,5:30PM” class=”svt-cd-green” ] तीन तासात 106 मिमी पाऊस झाला, ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली, पूर्ण रात्रभर आपत्तीव्यवस्थेचे काम सुरू होते, महसूल विभागाने महापालिकेच्या मदतीने पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे, पहिल्यांदाच अशी परिस्थिती उदभवली : पुणे आयुक्त सौरभ राव [/svt-event]

[svt-event date=”26/09/2019,5:29PM” class=”svt-cd-green” ] रात्रीपासून साडेतीन हजार लोकांना रात्री स्थलांतरित केलं : पुणे आयुक्त सौरभ राव [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील परिस्थितीचा आढावा” date=”26/09/2019,10:18AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कऱ्हा नदीचा प्रवाह वाढला” date=”26/09/2019,10:17AM” class=”svt-cd-green” ] बारामती : कऱ्हा नदीचा प्रवाह प्रचंड वाढला, बारामती शहरातील नागरी वस्तीत पाणी शिरले, अनेक घरे पाण्याखाली [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात पावसाचा हाहाःकार” date=”26/09/2019,8:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

पुण्यात काल रात्री आठ वाजल्यापासून पावसाने जोर धरला. मुसळधार पावसामुळे (Pune City Heavy Rains) शहरातील सर्वच भागातील रस्ते जलमय झाले. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. रस्त्यावरच्या पाण्यात अनेकांच्या गाड्या बंद पडल्या आहेत. महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी काळजी करु नये आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कुणाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असं आवाहन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलं आहे.

शाळांना सु्ट्टी जाहीर

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवार 26 सप्टेंबर 2019 रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

स्विफ्ट आणि रिक्षावर झाड कोसळलं

शिवाजीनगरमधील सिमला ऑफिस चौकामध्ये मुसळधार पावसामध्ये स्विफ्ट आणि एका रिक्षावर झाड पडून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर दोघांची प्रकृती ठीक आहे. जखमींना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

पुणे शहरातील विविध भागांची स्थिती (Pune City Heavy Rains)

– वारजे ब्रिजखाली पाणी शिरल्यामुळे वारजे ते कोथरुड रस्ता बंद.

– सहकारनगर तळजाईला जाणारा रस्ता नाला फुटल्यामुळे ब्लॉक झाला आहे. गजानन महाराज मठापासून पुढे भरपूर पाणी साचल्यामुळे गाड्या वाहून गेल्या आहेत.

– कोल्हेवाडी परिसरात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आलंय

– पेठामध्ये रस्त्यावर जागोजागी पाणी साचलं आहे. तसेच सोसायटीमध्ये पाणी जमा झाले आहे.

– बाणेर रस्त्यावर सिंध सोसायटीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पाण्यातून चारचाकी गाड्याही बंद पडत आहेत.

– दांडेकर पूल झोपडपट्टीत आंबील ओढ्यातून आलेले पाणी शिरलं आहे, पोलीस पाण्यात उतरुन नागरिकांना घरातून सुरक्षित बाहेर काढत आहेत.

– बालाजीनगर, संतोषनगर, कात्रज, आंबेगाव खुर्द अत्यंत गंभीर परिस्थिती, कात्रज बोगदा परिसर दरड कोसळली, आनेक ठिकाणी गाड्या वाहून गेल्या, पहिल्या मजल्या पर्यंत पाणी भरले आहे.

– दांडेकर वस्ती, आंबील ओढा परिसरातील घरात पाणी शिरल्यामुळे तेथील रहिवाशांना राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले कला मंदिरात हलवण्यात आलं

– कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची भिंत कोसळली

– सिंहगड रोडवरच्या नवले हॉस्पिटलमध्ये पाणी शिरले, पहिला मजला पाण्यात

– एनडीआरएफची टीम सहकारनगर आणि फातिमानगर परिसरात दाखल

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, गोदावरी नदीला पूर

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.