भवानी पेठेत 118 ‘कोरोना’ग्रस्त, 15 रहिवाशांनी प्राण गमावले, पुण्याची प्रभागनिहाय रुग्णसंख्या

भवानी पेठेत कालच्या दिवसात तब्बल 22 नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत इथे 118 रुग्ण सापडले असून 15 रहिवाशांचा 'कोरोना'मुळे बळी गेला आहे (Pune corona hot spot ward wise patients and deaths)

भवानी पेठेत 118 'कोरोना'ग्रस्त, 15 रहिवाशांनी प्राण गमावले, पुण्याची प्रभागनिहाय रुग्णसंख्या
Follow us
| Updated on: Apr 17, 2020 | 5:43 PM

पुणे : पुण्यात ‘कोरोना’बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या प्रभागाचा लेखाजोखा पुणे महापालिकेने नकाशाच्या माध्यमातून मांडला आहे. ‘कोरोना’चा ‘डेथ झोन’ ठरलेल्या भवानी पेठेत सर्वाधिक 118 रुग्ण असून तब्बल 15 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Pune corona hot spot ward wise patients and deaths)

पुण्यात 16 एप्रिलपर्यंत सापडलेल्या 450 कोरोनाग्रस्त रुग्णांचा आढावा घेण्यात आला आहे. तर 45 जणांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत. 346 रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमध्ये, तर 104 जणांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भवानी पेठेत कालच्या दिवसात तब्बल 22 नवे रुग्ण सापडले आहेत. भवानी पेठ परिसरात सातत्याने कोरोना रुग्ण आढळत असल्याने इथली रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. आतापर्यंत इथे 118 रुग्ण सापडले असून 15 रहिवाशांचा ‘कोरोना’मुळे बळी गेला आहे

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ)

औंध – बाणेर – 3 कोथरुड – बावधन – 1 सिंहगड रोड – 8 वारजे कर्वेनगर – 9 शिवाजीनगर – घोलेरोड – 28 (+1) कसबा – विश्रामबागवाडा – 51 (+6) धनकवडी – सहकारनगर – 27 (+1) भवानी पेठ – 118 (+22) बिबवेवाडी – 17 (+2) ढोले पाटील रोड – 57 (+9) येरवडा – धानोरी – 43 (+10) नगररोड – वडगावशेरी – 6 (+1) वानवडी – रामटेकडी – 24 (+2) हडपसर – मुंढवा – 21 (0) कोंढवा – येवलेवाडी – 9 (0) पुण्याबाहेरील रुग्ण – 21 (+3)

(Pune corona hot spot ward wise patients and deaths)

वॉर्ड – ‘कोरोना’ बळी

औंध – बाणेर – 1 कोथरुड – बावधन – 0 सिंहगड रोड – 0 वारजे कर्वेनगर – 1 शिवाजीनगर – घोलेरोड – 3 कसबा – विश्रामबागवाडा – 5 धनकवडी – सहकारनगर – 2 भवानी पेठ – 15 बिबवेवाडी – 1 ढोले पाटील रोड – 3 येरवडा – धानोरी – 3 नगररोड – वडगावशेरी – 0 वानवडी – रामटेकडी – 5 हडपसर – मुंढवा – 3 कोंढवा – येवलेवाडी – 1 पुण्याबाहेरील रुग्ण – 2

आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील हवेली, शिरुर, बारामती, भोर, वेल्हे, मुळशी आणि जुन्नर या सात तालुक्यात कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर उर्वरित इंदापूर, मावळ, दौंड, खेड, पुरंदर आणि आंबेगाव या सहा तालुक्यात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. भोर आणि पुरंदर या दोन तालुक्यात ‘बारामती पॅटर्न’ राबवायला सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर अद्यापही सर्वाधिक आहे. राज्यातील मृत्यूदर 6.41 टक्के आहे, परंतु पुण्यातील ‘कोरोना’ग्रस्तांचा मृत्यूदर दहा टक्क्यांच्या आसपास आहे. राज्यातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी मुंबईत गेले असले, तरी रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक मृत्यू पुण्यात आहेत. रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहिल्यानंतर राज्यात सर्वाधिक म्हणजे 9.3 टक्के मृत्यूदर पुण्यात असल्याचं दिसून येतं.

ससून रुग्णालयात पुण्यातील सर्वाधिक म्हणजे 38 जणांचे मृत्यू झाले आहेत. अनेक कोरोनाबाधित रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर आजार किंवा शस्त्रक्रिया झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

(Pune corona hot spot ward wise patients and deaths)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.