Pune | 50 हजार टेस्ट किट, अडीच हजार खाटा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पुणे प्रशासन सज्ज
पुण्यात लक्षणे जाणवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वेळेत तपासणी करण्यासाठी 'अँटिजेन टेस्ट'ला प्राधान्य दिले जाणार आहे.
पुणे : दिवाळीनंतर पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे (Pune Corona Second Wave). त्यामुळे पुण्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने (Pune Municipal Corporation ) आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे (Pune Corona Second Wave).
पुण्यात लक्षणे जाणवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वेळेत तपासणी करण्यासाठी ‘अँटिजेन टेस्ट’ला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने नव्याने 50 हजार किट मागवले आहेत. तसेच, ‘स्वॅब कलेक्शन सेंटर’ आणि ‘आरटीपीसीआर’चेही प्रमाण वाढविण्यात येणार आहे.
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कोरोनाचा दुसरा टप्पा सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या टप्प्यात रोज अडीच हजार नवे रुग्ण सापडण्याची भीती आहे. एवढ्या रुग्णांना मोफत आणि वेळेत उपचार देण्यासाठी महापालिकेने अडीच हजार बेडचीही व्यवस्था केली आहे.
परंतु उपचाराआधी तपासण्यांचेही प्रमाण वाढविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहेत. त्यातून रोजच्या तपासणीचे प्रमाण दीड हजारांवरुन पुन्हा सहा हजारांपेक्षा अधिक करण्यात येणार आहेत. त्यात ‘आरटीपीआर टेस्ट’ सर्वाधिक असल्या तरी ‘अँटिजेन’चेही प्रमाण वाढवले जाणार आहे. त्यासाठी 50 हजार किट मागवण्यात आले आहेत. या किटच्या माध्यमातून रोज दीड हजार नागरिकांची तपासणी करता येणार आहे (Pune Corona Second Wave).
दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढली
दिवाळीनंतर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. बुधवारी तपासणी झालेल्यांमध्ये साधारणत: 14 टक्के व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर, दिवसभरात 2 हजार 743 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 384 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात साधारणत: शहरात दिवसाला दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून येत होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून यात वाढ होत आहे. 10 टक्क्यांच्या आत आलेला शहराचा पॉझिटिव्ह दर आता 13 टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
पुणे शहरात आतापर्यंत 7 लाख 73 हजार 879 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 65 हजार 426 जण पॉझिटिव्ह, तर 1 लाख 56 हजार 639 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 401 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिवाळीनंतर पुण्यात कोरोनाचा धोका वाढला, एकाच दिवशी 14 टक्के रुग्ण पॉझिटिव्हhttps://t.co/onvOLHqKTA
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 19, 2020
Pune Corona Second Wave
संबंधित बातम्या :
कोरोना मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न, ऑडिट कमिटी नेमणार