Pune Corona Virus | पुण्यात 15 जण कोरोनाबाधित, 876 लोक क्वारंटाईन
देशात कोरोनाबाधितांचा आकडा 324 वर पोहोचला (Pune Corona Virus Case increase) आहे. तर महाराष्ट्रात 24 तासात कोरोना रुग्णांचा आकडा 74 झाला आहे.
मुंबई : देशात कोरोनाबाधितांचा आकडा 324 वर पोहोचला (Pune Corona Virus Case increase) आहे. तर महाराष्ट्रात 24 तासात कोरोना रुग्णांचा आकडा 74 झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 10 नवे रुग्ण आढळले आहेत. यात 6 मुंबईचे आणि 4 पुण्यातील रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा वाढता कहर पाहायला मिळत आहे.
पुण्यातील आरोग्य (Pune Corona Virus Case increase) विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 432 जणांचे रिपोर्ट हे नेगिटिव्ह आले आहेत.
पुण्यात आज दिवसभरात 466 रुग्णांचे सॅम्पल गोळा करण्यात आले. यातील 19 जणांचे अद्याप रिपोर्ट आलेले नाहीत. तर 432 जणांना डिस्चार्ज करण्यात आलं आहे. तर एकूण 33 जण कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं आहे. यातील एक जण गंभीर आहे. त्याशिवाय पुण्यात एकूण 1 हजार 637 प्रवासी बाहेरुन दाखल झाले आहेत. त्यातील 876 लोकांना क्वारंटाईन केलं (Pune Corona Virus Case increase) आहे.
महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
पिंपरी चिंचवड – 12 पुणे – 15 मुंबई – 25 नागपूर – 4 यवतमाळ – 4 कल्याण – 4 नवी मुंबई – 3 अहमदनगर – 2 पनवेल – 1 ठाणे -1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1 उल्हासनगर – 1 एकूण 74
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबईत (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई महिला (1) – 19 मार्च उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च एकूण – 74 कोरोनाबाधित रुग्ण
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च महाराष्ट्र – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च एकूण – 6 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू