Pune Corona Discharge | पुण्यात कोरोनाबाधित डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या वाढली, 12 दिवसात 937 जणांना डिस्चार्ज
पुणे जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. मात्र त्याचबरोबर डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्याही (Pune Corona Patient Discharge) वाढ आहे.
पुणे : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत असताना (Pune Corona Patient Discharge) डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्येत वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. मात्र त्याचबरोबर डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढ आहे. पुण्यात 1209 कोरोना रग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 1358 रुग्ण डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत (Pune Corona Patient Discharge) आहे. त्याचबरोबर मृत्यूचा आकडाही वाढत चालला आहे. पुण्यात बुधवारी दुपारपर्यंत 2 हजार 737 कोरोना रुग्ण आणि 156 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर जिल्ह्यात दुपारपर्यंत 3 हजार 169 बाधित रुग्ण आणि 168 मृत्यू झाला आहे.
एकीकडे अशी परिस्थिती असली तरी डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमाली वाढली आहे. पुण्यात आतापर्यंत 1 हजार 209 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 358 रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत.
पुण्यात आतापर्यंत 10 मे रोजी सर्वाधिक तब्बल 194 रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. तर जिल्ह्यात 10 मे रोजी सर्वाधिक 202 रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. गेल्या 12 दिवसांपासून सातत्याने 50 पेक्षा जास्त रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात आहे.
सद्यस्थितीत पुण्यात 1372 रुग्ण ॲक्टीव्ह आहेत. म्हणजेच डिस्चार्ज झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या केवळ 163 अंकांनी कमी आहे. तर जिल्ह्यात 1608 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1358 डिस्चार्ज झाले आहेत. म्हणजेच ॲक्टिव रुग्णांचे प्रमाण हे डिस्चार्ज रुग्णांपेक्षा केवळ अडीचशेनं जास्त आहे.
नवीन नियमावलीनुसार रुग्णांना दहा दिवसात डिस्चार्ज केलं जातं आहे. त्यामुळे 10 मेपासून डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं. पुणे शहरात गेल्या 12 दिवसात 937 रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आले.
(Pune Corona Patient Discharge)
पुणे शहरातील डिस्चार्ज रुग्ण (1 ते 12 मेपर्यंत)
तारीख – डिस्चार्ज रुग्ण
1 मे – 51
2 मे – 53
3 मे – 55
4 मे – 50
5 मे – 52
6 मे – 52
7 मे – 84
8 मे – 61
9 मे – 96
10 मे – 194
11 मे – 69
12 मे – 120
पुणे जिल्ह्यातील डिस्चार्ज रुग्ण (1 ते 12 मेपर्यंत)
1 मे – 52
2 मे – 52
3 मे – 86
4 मे – 54
5 मे – 55
6 मे – 57
7 मे – 97
8 मे – 65
9 मे – 110
10 मे – 202
11 मे – 101
12 मे – 118
(Pune Corona Patient Discharge)
संबंधित बातम्या :
Pune corona death | पुण्यात ‘या’ वयोगटातील तब्बल 80 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
Pune Corona | पुण्यात साडे सात लाख नागरिकांची तपासणी होणार, महापालिकेचं नियोजन