Pune Corona Update | …तर 18 मेपर्यंत पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9600 पोहोचण्याचा अंदाज : आयुक्त

सध्याच्या परिस्थितीनुसार, 8 मे रोजी 4,800 पॉझिटिव्ह रुग्ण असतील, तर 18 मे रोजी 9,600 पॉझिटिव्ह रुग्ण असतील, असं आयुक्तांनी सांगितलं.

Pune Corona Update | ...तर 18 मेपर्यंत पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9600 पोहोचण्याचा अंदाज : आयुक्त
Follow us
| Updated on: Apr 28, 2020 | 8:20 PM

पुणे : पुण्यात कोरोना मोठ्या प्रमाणात आणि जलद (Pune Corona Virus Update) गतीने पसरतो आहे, अशी चर्चा आहे. सात दिवसाला रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचं प्रमाण असल्याचं बोललं जातं आहे. केंद्रीय पथकाच्या दौऱ्यावेळी रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण सात दिवसाचं होतं. मात्र, आता रुग्ण दुप्पट (Pune Corona Virus Update) होण्याचे प्रमाण नऊ दिवसांवर गेल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.

“सध्याच्या परिस्थितीनुसार, 8 मे रोजी 4,800 पॉझिटिव्ह रुग्ण असतील, तर 18 मे रोजी 9,600 रुग्ण आणि 31 मेपर्यंत साधारण 10,000 हजार रुग्ण असतील तर 20 हजार जण क्वारंटाईन असतील”, असेही आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं.

“कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, काही झोपडपट्टीत पुन्हा पुन्हा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पाच वॉर्डात दीडशे शाळा खुल्या करुन दिल्या आहेत. साधारण 15 ते 20 टक्के लोक या सुविधेचा फायदा घेतील”, असं मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी म्हटलं. मात्र, प्रशासन कोणाला हलवणार नसून आपण जागा उपलब्ध करुन दिली. त्यानुसार, निर्णय हा नागरिकांवर अवलंबून (Pune Corona Virus Update) असल्याचं त्यांनी म्हटलं.

“मनपाच्या 340 शाळांमध्ये एक लाख लोकांची सोय होऊ शकते, तर 34 शासकीय वसतिगृहात 35 हजार नागरिकांची सोय होऊ शकेल”, असेही आयुक्तांनी सांगितलं. “हॉटस्पॉट क्षेत्रीय कार्यालयातील स्वच्छतेवर भर दिला जात आहे. दिवसातून तीन वेळा सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ केले जात आहेत. त्याचबरोबर सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली जात आहे. नागरिकांनी एकाच वेळी वेगवेगळ्या वस्तू आणण्यासाठी बाहेर पडू नये. एकाच व्यक्तीने सर्व वस्तू आणाव्यात”, असं आवाहनही त्यांनी केलं.

नवीन गाईडलाईननुसार, निगेटिव्ह रुग्ण स्वतःच्या घरी राहू शकत असेल, तर त्यांना घरी सोडावं. त्याचबरोबर लक्षणं नसलेला पॉझिटिव्ह रुग्णसुद्धा घरी राहू शकतो. केवळ घरात राहिल्याने नाही, तर एकमेकात मिसळल्याने संसर्ग होत असल्याचेही (Pune Corona Virus Update) आयुक्तांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

भवानी पेठेसह पाच हॉटस्पॉटमधील 20 हजार कुटुंबांचं तात्पुरतं स्थलांतर होणार, पुण्याची वॉर्डनिहाय रुग्णसंख्या

पुणे विभागातील 230 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 1457 वर : विभागीय आयुक्त

पुण्यातील 102 पोलीस चौकीचं काम पोलीस ठाण्यातून चालणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

पिंपरी चिंचवडमध्ये शंभरीपार कोरोनाग्रस्त, रुपीनगरमध्ये 9 नवे रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.